Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाचे 18 हजार 600 नवे रूग्ण, 402 जणांचा मृत्यू

| Updated on: May 30, 2021 | 11:22 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाचे 18 हजार 600 नवे रूग्ण, 402 जणांचा मृत्यू
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 May 2021 10:50 PM (IST)

    सांगलीत दिवसभरात 872 नवे कोरोनाबाधित

    सांगली कोरोना / म्युकर अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 872 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 160, आज आढळलेले 29 रुग्ण, एकूण मृत्यू 9

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 27 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3401 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 12105 वर

    तर उपचार घेणारे 1292 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 101880 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 117383 वर

  • 30 May 2021 09:51 PM (IST)

    राज्यात कोरोनाचे 18 हजार 600 कोरोना रूग्ण, 402 जणांचा मृत्यू

    आज राज्यात कोरोनाचे 18 हजार 600 कोरोना रूग्ण

    आज राज्यात कोरोनाने 402 जणांचा कोरोनाने मृत्यू

    आज राज्यात 22532 कोरोना रूग्णांतून मुक्त

  • 30 May 2021 07:26 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 1003 रुग्ण कोरोनामुक्त, 670 जणांना कोरोनाची लागण

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण झालेले रुग्ण- 1003

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ - 670

    नाशिक मनपा- 234 नव्या रुग्णांची नोंद

    नाशिक ग्रामीण- 401 नव्या रुग्णांची नोंद

    मालेगाव मनपा- 11 नव्या रुग्णांची नोंद

    जिल्हा बाह्य- 24 नव्या रुग्णांची नोंद

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4666

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -29

    नाशिक मनपा- 08 रुग्णांचा मृत्यू

    मालेगाव मनपा- 01 रुग्णांचा मृत्यू

    नाशिक ग्रामीण- 20 रुग्णांचा मृत्यू

  • 30 May 2021 07:11 PM (IST)

    मुंबई-आग्रा महामार्गवर बियर वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात, रस्त्यावर बिअरचा खच

    धुळे :  मुंबई-आग्रा महामार्गवर बियर वाहतूक करणारी गाडी पालटली महामार्गवरील वाहतूक काहीश्या प्रमाणावर विस्कळीत रस्त्यावर बिअरचा खच नरढाणा गावाजवळ घटना घडली

  • 30 May 2021 06:53 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 486 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 887 रुग्णांना डिस्चार्ज 

    पुणे कोरोना अपडेट

    - दिवसभरात 486 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    - दिवसभरात 887 रुग्णांना डिस्चार्ज

    - पुण्यात करोनाबाधीत 27 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 9

    - 954 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 469747

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6615

    - एकूण मृत्यू -8232

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 454900

    - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7423

  • 30 May 2021 06:45 PM (IST)

    साताऱ्यात 1990 संशयितांना कोरोनाची लागण, दिवसभरात 26 बाधितांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट

    साताऱ्यात 1990 संशयितांना कोरोनाची लागण

    दिवसभरात 26 बाधितांचा मृत्यू

    आज 1360 नागरिकांना दिला डिस्चार्ज

    आज अखेर साताऱ्यातील कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने – 777742

    कोरोनाबाधितांची संख्या – 164463

    घरी सोडण्यात आलेले रुग्ण – 138801

    एकूण मृत्यू -3642

    उपचार सुरु असलेले रुग्ण - 22009

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 30 May 2021 06:15 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 553 जण कोरोनामुक्त, 298 जणांना कोरोनाची लागण, तर 02 जणांचा मृत्यू

    चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त

    - 24 तासात 553 कोरोनामुक्त, 298 पॉझिटिव्ह तर 02 जणांचा मृत्यू

    - आतापर्यंत 78,186 जणांची कोरोनावर मात

    - जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 605 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 78 हजार 186 आहे.

    - सध्या 2 हजार 978 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

    - आतापर्यंत 4 लाख 70 हजार 446 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 85 हजार 187 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

    - जिल्ह्यात आतापर्यंत 1441 बाधितांचे मृत्यू झाले आहेत

  • 30 May 2021 05:36 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात आढळले 108 नवे रुग्ण, एकूण 457 जणांचा मृृत्यू

    वाशिम कोरोना अलर्ट

    जिल्ह्यात आज नवे आढळले 108  रुग्ण

    तर आज  124  जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 02 रुग्णांचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात 15 मे नंतर मागील 16 दिवसात 101 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे 5259 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 7245 रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 39949

    सध्या सक्रिय रुग्ण – 2437

    एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण – 37054

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 457

  • 30 May 2021 05:34 PM (IST)

    नागपुरात आज 357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर : नागपुरात आज 357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    1041 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या - 474286

    बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या - 458613

    एकूण मृत्यूसंख्या - 8892

  • 30 May 2021 04:49 PM (IST)

    मृतदेह नदीत फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल, उत्तरप्रदेशमधील बलरामपूर येथील प्रकार

    बलरामपूर : उत्तरप्रदेशमधील बलरामपूर येथील व्हिडीओ व्हायरल

    कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

    कोरोना व्यक्ती मृत झाला असल्य़ाची माहिती

    नातेवाईकांना मृतदेह देण्यात आला होता

    त्यांच्याकड़ून मृतदेह नदीत फेकला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल

    या प्रकऱणी गुन्हा नोंदवण्यात आल्याची प्रशासनाची माहिती
  • 30 May 2021 03:21 PM (IST)

    सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांत सिंगचे माजी नोकर नीरज आणि केशव यांना बोलावले

    सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांत सिंगचे माजी नोकर नीरज आणि केशव यांना बोलावले.

    दोघेही मुंबई एनसीबी पासून वाचन्यासाठि 2 महिन्यांपासून मुंबईबाहेर होत

    ऑगस्टमध्ये हे दोघे मुंबईला परतले आणि दोघांनीही बॉलिवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी काम करण्यास सुरुवात केली

  • 30 May 2021 03:13 PM (IST)

    कोरोनात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

    पुणे - देशात दडपशाही, हुमूकशाही पाहायला मिळते

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

    - पहिल्या पाच वर्षात नोटबंधीसारखा चुकीचा निर्णय घेतला

    - जीएसटीचा ढिसाळ कारभार सुरु आहे

    - ताळेबंदी करताना कुांठलेही नियोजन नाही

    - परप्रांतीयांच्या मोठ्या रांगा लागल्या, लोक चिरडून मेली

    - कोरोनात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही

    सरकारला लसीचे नियोजन करता आलं नाही, देशाच्या बाहेर लस गेली

    - 20 ऑक्टोबर 2020 ला केंद्रीय आरोग्य सचिव ऑक्सिजनवर बोलले होते

    - 1 लाख टन लिक्विड ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं होतं.  ते खोट बोलल्याचे नंतर समोर आलं

    - कोरोनाच्या काळात फक्त घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात काहीही केलं नाही

    - मोफत लस देण्याचा विषय होता, आता काय सुरुय बघा

    - राज्य सरकार आणि उद्योगपती यांच्याकडे लसीकरणाचा विषय ढकलला जातोय.

  • 30 May 2021 01:58 PM (IST)

    मोदी सरकारच्या सात वर्षाच्या अपयशी कारभाराच्या निषेधार्थ परभणीत काँग्रेसचे आंदोलन

    मोदी सरकारच्या सात वर्षाच्या अपयशी कारभाराच्या निषेधार्थ परभणीत काँग्रेसचे आंदोलन गळ्यात काळ्या रुमाल बांधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केले आंदोलन काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 30 May 2021 01:27 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात माझा विद्यार्थी माझी जबादारी उपक्रम राबवणार, सतेज पाटील यांची माहिती

    कोल्हापूर जिल्ह्यात माझा विद्यार्थी माझी जबादारी उपक्रम राबवणार

    पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

    संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची खबरदारी

    विद्यार्थी विद्यार्थिनीच समुपदेशन होणार

    शिक्षक करणार विद्यार्थ्यांचे समुपदेश

    व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांची माहितीचा डाटा शिक्षक करणार

    प्रोटोकॉल, टास्क फोर्स च्या माध्यमातूनच उपचार होणार

    पालकांनी सोशल मीडियातील माहिती वरून उपचार करू नयेत

    उपचारा बाबत सूचना द्या.त्याच्यावर तज्ञ विचार करतील

    मात्र परस्पर उपचार करू नका

  • 30 May 2021 12:32 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात माझा विद्यार्थी माझी जबादारी उपक्रम राबवणार, पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

    कोल्हापूर जिल्ह्यात माझा विद्यार्थी माझी जबादारी उपक्रम राबवणार पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

    संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची खबरदारी

    विद्यार्थी विद्यार्थिनीच समुपदेशन होणार

    शिक्षक करणार विद्यार्थ्यांचे समुपदेश

    व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांची माहितीचा डाटा शिक्षक करणार

    प्रोटोकॉल, टास्क फोर्स च्या माध्यमातूनच उपचार होणार

    पालकांनी सोशल मीडियातील माहिती वरून उपचार करू नयेत

    उपचारा बाबत सूचना द्या.त्याच्यावर तज्ञ विचार करतील

    मात्र परस्पर उपचार करू नका

  • 30 May 2021 12:06 PM (IST)

    केंद्राने लसीकरण पुरवठा केला म्हणजे उपकार केले नाहीत तो राज्यांचा अधिकार, भाई जगताप यांची टीका

    -देशात कोट्यावधी लोकांचा मृत्यु होतोय , गंगेत मृतदेहांची विटंबना होतेय त्यालाही धर्माचा रंग दिला जात आहे पण लोक हुशार आहेत - सात वर्षात भाजपाने काय केलं - पाच राज्यात निवडणुकीत लोकांनी जागा दाखवून दिली मग अश्रु आले हे अश्रु मगरीचे - महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण झाले... -पहिले देवेंद्र फडणवीस बोलले की राज्यात लसीकरण झाले नाही आता बोलत आहेत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले -केंद्राने लस दिली म्हणजे उपकार नाही केले, लस मिळवणे हा आमचा हक्क आहे -केंद्राने लसीकरण पुरवठा केला म्हणजे उपकार केले नाहीत तो राज्यांचा अधिकार - लस विदेशात का पाठवली, ९३ देशात लस का पाठवली

  • 30 May 2021 12:05 PM (IST)

    18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसी द्या, सोलापुरात भररस्त्यात आंदोलन

    सोलापूर-- 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्याच्या मागणीसाठी एका तरुणाने भररस्त्यात आंदोलन

    माय-बाप सरकारने देण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन आंदोलन

    राज सलगर असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आता लसीचा साठा प्रशासन 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्राधान्य द्यावे कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांनी गमावला आहे आपला जीव

    त्यामुळे आता तरी प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी

  • 30 May 2021 11:57 AM (IST)

    बाळासाहेब थोरात यांची पंतप्रधान मोदींवर टीका

    बाळासाहेब थोरात यांची पंतप्रधान मोदींवर टीका

    7 वर्षात मोठी मोठी आश्वासन दिली आणि सत्ता हस्तगत केली - मोदी सरकार ने तरुणांना 2 कोटी रोजगार देऊ - 15 लाख खात्यावर टाकू - काळा पैसा भारतात आणणार - ही सर्व अश्वासन दिली काहीही पूर्ण केलं नाही

  • 30 May 2021 11:19 AM (IST)

    18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्याच्या मागणीसाठी सोलापुरात तरुणाचं भररस्त्यात आंदोलन

    18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्याच्या मागणीसाठी एका तरुणाने भररस्त्यात आंदोलन

    माय-बाप सरकारने देण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन आंदोलन

    राज सलगर असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आता लसीचा साठा प्रशासन 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्राधान्य द्यावे कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांनी गमावला आहे आपला जीव

    त्यामुळे आता तरी प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी...

  • 30 May 2021 11:18 AM (IST)

    सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीज पुरवठा सुरळीत, किल्ले रहिवाशांकडून खा. विनायक राऊत,वैभव नाईक यांचे आभार

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे विद्युत पोल, वाहिन्या तुटून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.विद्युत वाहिन्या समुद्रातुन जात असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांना अनेक अडथळे येत होते. याबाबत खासदार विनायक राऊत, व आमदार वैभव नाईक यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकाशगड येथून आलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या टीमच्या सहाय्याने पडलेले पोल व विद्युत वाहिन्या पुन्हा बसवून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीज पुरवठा काल पासून सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांनी किल्ले रहिवाशांच्या घरात विजेचा लखलखाट झाला आहे. अथक प्रयत्नांनी वीजपुरवठा सुरू करून दिल्याबद्दल किल्ले रहिवाशांनी खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक व विजवितरण कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

  • 30 May 2021 11:10 AM (IST)

    दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात

    गेल्या 100 वर्षात सर्वात मोठी महामारी

    देश पूर्ण ताकदीने कोरोनाशी लढतोय

    दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा

    ऑक्सिजनचा पुरवठा करणे मोठे आवाहन

    १० दिवसात देशाने दोन चक्रीवादळाचा सामना केलाय

    दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली

  • 30 May 2021 10:53 AM (IST)

    पुण्यात दीड महिन्यांनी मार्केट यार्ड सुरु, शेतमालाची आवक कमी

    पुणे -

    - पुण्यातील कोरोना विकएन्ड लॉकडाऊन उठल्यानंतर आज तब्बल दीड महिन्यांनी रविवारच्या दिवशी मार्केट यार्ड सुरू

    शेतमालाची आवक प्रचंड कमी झाली.

    एरवी 1500 गाड्यांची आवक होते आज माञ अवघ्या 250 गाड्या गुलटेकडी मार्केटमध्ये दाखल

  • 30 May 2021 10:21 AM (IST)

    औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढते, इंजेक्शनचा तुटवडा

    औरंगाबाद :-

    म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा कायम..

    शनिवारी रुग्णांच्या उपचारासाठी इंजेक्शन आलेच नाही..

    रुग्णांचे प्रमाण वाढत असताना औषधींचा ठणठणाट..

    अँम्फोटेरिसिन इंजेक्शनचा मोठा तुटवडा..

    मुंबईसह इतर जिल्ह्यात इंजेक्शनसाठी नातेवाईकांचा शोध सुरू...

    औरंगाबाद शहरात तब्बल 375 म्युकरमायकोसिसचे रुग्ण..

    शनिवारी रुग्णालयास एकही इंजेक्शन मिळाले नाही

  • 30 May 2021 09:07 AM (IST)

    सोलापुरात कोरोना लसीचे 14 हजार डोस वाया

    सोलापूर-- कोरोना लसीचे जिल्ह्यात 14 हजार डोस गेले वाया

    पाचमिलि च्या एका बाटलीत दहा डोस

    एकदा बाटलीचे सील फोडल्यानंतर चार तासात लस देणे गरजेचे

    मात्रा लसीकरण सत्राच्या समारोपावेळी दहापेक्षा कमी लोक असल्यावर डोस वाया

    18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केल्यावर नोंदणी सक्तीची करण्यात आली होती

    या काळात नोंदणी करून या अनेक जण आल्याने डोस गेले वाया

  • 30 May 2021 08:30 AM (IST)

    सोलापुरात होमआयसोलेशन बंदचे आदेश, सोलापूर महानगरपालिकेत अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

    सोलापूर- शहरात होमआयसोलेशन बंदचे आदेश

    मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

    मार्च-एप्रिल महिन्यात शहरात बधितांचे  प्रमाण जास्त असल्यामुळे लक्षणे नसलेल्यांना घरीच आयोसलेशन  करण्यावर होता भर

    शहरात रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे होम आयसोलेशन बंद करण्याचे शासनाचे आदेश

    मात्र सोलापूर महानगरपालिकेत त्याची अंमलबजावणी नाही

  • 30 May 2021 08:28 AM (IST)

    कोल्हापुरातील 20 लॅबला नोटीसा, जिल्ह्यातील 11 तर जिल्ह्याबाहेरील 9 लॅब चा समावेश

    कोल्हापूर

    कोरोना काळातील विविध चाचण्यांचे अहवाल आणि माहिती न देणाऱ्या 20 लॅबना नोटिसा

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची कारवाई

    जिल्ह्यातील 11 तर जिल्ह्याबाहेरील 9 लॅब चा समावेश

    चाचण्यांची माहिती एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प विभागाकडून सादर करणे होतं बंधनकारक

    मात्र 25 एप्रिल ते 12 मे या काळात काही लॅब नी माहिती सदरच केली नसल्याचं चौकशीत निष्पन्न

  • 30 May 2021 08:27 AM (IST)

    पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी प्रयोगशाळा कोरोना नमुना तपासणीत राज्यात अव्वल

    पुणे

    पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी प्रयोगशाळा कोरोना नमुना तपासणीत राज्यात अव्वल,

    राज्यातील सर्वच प्रयोगशाळांना आणि एन आय व्हीलाही टाकलं मागे,

    बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयानं आतापर्यंत 4 लाख 20 हजार नमुन्यांची केली तपासणी,

    एन आयव्हीमध्ये आतापर्यंत 3 लाख 17 हजार नमुन्यांची करण्यात आलीये तपासणी

  • 30 May 2021 08:25 AM (IST)

    नागपूरला मोठा दिलासा, 30 दिवसात 70 हजार कोरोना रुग्ण बरे

    नागपूर -

    गेल्या 30 दिवसात 70 हजार कोरोना रुग्ण बरे झाल्याने नागपूर ला मोठा दिलासा

    रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्के वर पोहचला

    सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्या 400 च्या खाली

    तर 24 तासात 14 मृत्यू ची नोंद

    सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 627 वर पोहचली

  • 30 May 2021 08:25 AM (IST)

    वर्धा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह दरात घसरण

    वर्धा

    - जिल्ह्यात रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी दरात घसरण

    - मागील काही दिवसात रुग्णसंख्येत घसरण झाल्यान दर ९.८ टक्केवर

    - रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी सावध राहण्याची गरज

    - जिल्ह्यात मागील २४ तासात आढळले २३५ रुग्ण

    -आतापर्यंत जिल्ह्यात १२७० रुग्णांचा मृत्यू

    - जिल्ह्यात २८४४ ऍक्टिव्ह रुग्ण

  • 30 May 2021 06:51 AM (IST)

    खासगी कोचिंग क्लासेस 1 जूनपासून सुरू करण्याची परवानगी द्या, क्लास चालकांची मागणी

    नाशिक :

    खासगी कोचिंग क्लासेस 1 जूनपासून सुरू करण्याची परवानगी द्या, क्लास चालकांची मागणी - कोरोनाचं सर्व नियम पाळू,परवानगी द्या - क्लास चालकांना आर्थिक संकटांचा करावा लागतोय सामना - विद्यार्थ्यांच ही होतय नुकसान - अन्यथा शासकीय स्तरावरून आर्थिक मदत करा..

  • 30 May 2021 06:50 AM (IST)

    नाशिक जिल्हा आरोग्य विभाग सज्ज, बालकांसाठी 50 खाटांचे सेंटर उभारणार

    - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आरोग्य विभाग सज्ज - जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णलयात बालकांसाठी 50 खाटांचे पीआयसीयू सेंटर उभारणार - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं तज्ज्ञांच मत - गेल्या दोन लाटेत नाशिक जिल्ह्यात 18 हजाराहून अधिक मुलं कोरोना बाधित - जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांची माहिती

  • 30 May 2021 06:49 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोनाबळींच्या संख्येत वाढ, 4 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू

    - नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 858 रुग्ण पॉझिटिव्ह

    तर 48 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

    - सर्वाधिक 23 मृत्यू ग्रामीण भागात

    - जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा गेला 4 हजार 637 वर

    - 2 हजार 302 रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर केली मात

  • 30 May 2021 06:43 AM (IST)

    राज्यातील एक लाख रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

    राज्यातील सुमारे दोन लाख रेस्टॉरंट्सपैकी जवळपास ५० टक्के रेस्टॉरंट्स कायमस्वरूपी बंद

    गेल्या वर्षी सात महिन्याच्या लॉकडाऊननंतर या क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत

    1 लाख कर्मचारी बेराेजगार झाले, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची माहिती

  • 30 May 2021 06:26 AM (IST)

    कोरोनामुळे व्यवसाय ठप्प, कर्ज फेडण्याच्या अवधीसह कर आकारणीबाबत दिलासा द्या, उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

    मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कठोर टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्याची बाब विचारात घ्यावी कर्ज फेडण्याच्या अवधीसह विविध प्रकारच्या कर आकारणीबाबत दिलासा द्यावा. या हॉटेल व रेस्टॉरंट मालकांच्या मागण्यांच्या निवेदनावर योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

  • 30 May 2021 06:25 AM (IST)

    कोरोना लसीकरणासाठी हॉटेल पॅकेज देणं बंद करा, गाईडलाईन्स फॉलो करा, केंद्रीय आरोग्य सचिवांचे सर्व राज्यांना पत्र

    कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र

    काही खासगी रुग्णालयं लसीकरणासाठी हॉटेलसोबत करार करत आहेत.

    हॉटेल पॅकेजमध्ये कोरोना लसीकरणाचा समावेश केला जात आहे.

    हे सर्व थांबवा. कोरोना लसीकरणाचे असे हॉटेल पॅकेज देणं बंद करा.

    लसीकरणासाठी गाइडलाइन्स फॉलो करा, असं या पत्रात म्हटलं आहे.

  • 30 May 2021 06:22 AM (IST)

    गोव्यात कोविड संकट गंभीर, 7 जूनपर्यंत संचारबंदी

    गोव्यात कोविड संकट अजून देखील गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील राज्यस्तरीय संचारबंदी 7 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सोशल मीडिया वरुन ही माहिती दिली आहे

  • 30 May 2021 06:21 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी, परिपत्रक जारी

    मुंबई : करोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी वारसांकडून नोकरीसाठी एसटीकडे हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे महामंडळावर बरीच टीका झाल्यानंतर वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात शनिवारी परिपत्रक जारी केले.

  • 30 May 2021 06:21 AM (IST)

    पुणे शहरात आज 72 केंद्रांवर कोरोना लसीकरण

    पुणे : महापालिकेने आज(रविवार) लसीकरणाचे नियोजन जाहीर केले असून, 57 ठिकाणी कोव्हीशील्ड तर 15 कोव्हॅक्सीन लसीचा केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले

Published On - May 30,2021 10:50 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.