
राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. मुंबईत पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळवली आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाने 125 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मुंबईत महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या या विजयामागे अनेक कारणे आहेत. यातील 5 प्रमुख कारणांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचार करताना भाजप सरकारच्या काळात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मुंबईतील रस्ते, फ्लायओव्हर, मुंबईकरांसाठी घरे यासह अनेक अनेक मुद्यांवर महायुतीनी मते मागितली. याचीच पोचपावती त्यांना जनतेने दिली आहे. मुंबईकरांनी महायुतीच्या 125 पेक्षा जास्त उमेदवारांना विजयी केलं आहे.
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
Maharashtra Election Results 2026 : पराभवानंतर अजित पवारांची पहिली मोठी प्रक्रिया..
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सांगली महापालिकेतील फायन आकडा घ्या जाणून
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मुंबई भाजपच्या हातात मराठी माणसाची कोंडी होईल असं ठाकरेंकडून सांगण्यात आलं, मात्र या भाजप आणि महायुतीकडून मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच होईल अशी ग्वाही मतदारांना दिली. त्यामुळेचे मराठी लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे या निकालातून समोर आले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंनी जबरदस्त तयारी केली होती. दोन्ही नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. या सभांमधून विरोधकांवर टीका टाळत विकास कामांची माहिती जनतेला दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती या सभांच्या माध्यमातून जनतेला देण्यात आली. तसेच आगामी 5 वर्षांमध्ये भाजपाचा विकासाचा प्लॅन काय आहे याची हेही भाजपकडून पटवून देण्यात आले. त्यामुळे हा मोठा विजय मिळाला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकनाथ शिंदेंसोबत महायुती करत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकनाथ शिंदेंच्या मागे असलेली ताकदही भाजपला मिळाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे तळागाळापासून भाजपला फायदा झाला. याचेच फळ म्हणून आज महायुती मुंबईत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपने गेल्या 6-7 वर्षांपासून प्लॅनिंग केले होते. सुरूवातीला आशिष शेलार आणि त्यानंतर आता अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपकडून रणनीती आखण्याचे काम केले होते. तळागळात कार्यकर्ते काम करत होते. भाजपने या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याचे आता समोर आले आहे.