
BMC Election 2026: भाजपचा 25 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप पक्षाने झेंडा फडकवला आहे. महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्र लढली आणि मोठा वियज प्राप्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर उद्धव ठाकरे फेल ठरलेत… महायुतीने बीएमसीमध्ये बहूमत मिळवलं आहे. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत. त्यामुळे मुंबईत देखील भाजप मोठा पक्ष ठरला आहे. कारण भाजपने सर्वांत श्रीमंत महानगरपालिकेवर आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे…
उद्धव ठाकरे यांच्या गटाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पक्षासाठी निवडणूक फार वाईट ठरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलं. 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 84 उमेदवार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्र आले. पण त्याचा देखील काही फायदा झाला नाही… कारण मनसेचा फक्त सहा जागांवर विजय झाला.
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू
Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
अशाप्रकारे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला फक्त 71 जागांवर विजय मिळवता आला. पण, उद्धव ठाकरे यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर चित्र काही प्रमाणात वेगळं दिसलं असतं. त्यांनी विधानसभा निवडणुकीसारखीच रणनीती अवलंबली असती तर आजचं चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं.
आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणची चूक झाली, ज्यामुळे बीएमसी त्यांच्या हातातून गेली… जर उद्धव ठाकरेंनी ती चूक केली नसती तर मुंबई त्यांच्याकडे राहिली असते. सध्याच्या निकालांकडे पाहता असं दिसतं की केवळ उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर काँग्रेस पक्षाने देखील चूक केली आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर निकाल काहीसा वेगळा आणि समाधानकारक असता. काँग्रेसने निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि 24 जागांवर विजय मिळवला. जर उद्धव ठाकरे काँग्रेसला पटवून देण्यात आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र करण्यात यशस्वी झाले असते, तर कदाचित बीएमसीमध्ये मतांचे विभाजन कमी झालं असतं आणि जास्त जागा जिंकता आल्या असत्या.
बीएमसी उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली… हा फार मोठा धक्का आहे. कारण मुंबई महानगरपालिका शिवसेनेची खरी ताकद आहे… गेल्या 25 वर्षांपासून एकट्या ठाकरे कुटुंबियांचे मुंबईवर वर्चस्व होतं. अशात निकाल समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्णय घेत पाऊल ठेवायला हवीत… उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत चर्चा करतील की मनसेसोबत राहतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.