AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे युतीचे शतक, ठाकरे बंधूना किती जागा ?

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शतक गाठत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांना आता केवळ 6 जागांची गरज आहे. दुसरीकडे, 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे-राज बंधूंच्या युतीला ६४ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे युतीची सत्ता येण्याचे चित्र स्पष्ट झाले असून, महापालिकेच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले आहे.

BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे युतीचे शतक, ठाकरे बंधूना किती जागा ?
बीएमसी निवडणुकीत भाजप-शिंदे सेना 100 पार
| Updated on: Jan 16, 2026 | 12:53 PM
Share

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी काल मतदान झालं. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाला.दिवस जसजसा वर चढत गेला मुंबईत भाजप-शिंदे गटाची सरशी होताना दिसू लागली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शतक पूर्ण केलं असून 106 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे 114 जागांची मॅजिक फिगर गाठून महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी त्यांना आता फक्त 06 जागांची गरज आहे. तर 20 वर्षांनी एकत्र आलेले राज व ठाकरे बंधू यांनीही युती करत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली खरी, पण ते केवळ 67 जागा मिळवू शकले आहेत.  त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता आता भाजप-शिंदे गटाच्या हातात जाणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

हाती आलेल्या कलांनुसार, भारतीय जनता पक्ष 85, शिवसेना 21, मनसे 9, शिवसेना ठाकरे गट 58 जागांवर आघाडीवर अशी आकडेवारी समोर आली आहे. 80हून अधिक जागांमुळे भारतीय जनता पक्ष हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  भाजप आणि शिंदे गटाने मिळून शकत गाठलं असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची युती हीच मुंबई पालिकेत सत्तेत असेल हेच हे आकडे दर्शवत आहेत.

ठाकरे बंधूंची भावनिक साद, मतदारांची मात्र पाठ

महाराष्ट्रासमोर आमच्यातले वाद शुल्लक आहोत. महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे सांगत राज व ठाकरे पर्यायाने मनसे-शिवसेना महापालिका निवडणुकीत एकत्र आलेली दिसली.  मुंबई वाचवा असा नारा देत, मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरत दोन्ही ठाकरे बंधूंनी मतदारांना भावनिक सादही घातली. मात्र त्यांचा करिश्मा फारसा चाललेला नाही. ठाकरे बंधू आणि शरद पवार यांनी एकत्र निवडणूक लढवून सुद्धा त्यांना केवळ 67 जागांवर समाधान मानावे लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे मनसे, म्हणजेच राज ठाकरे यांना एकत्र घेऊनही उद्धव ठाकरे यांना फारसा फायदा मिळाल्याचे दिसत नाहीये.  ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईतील विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक- 50 – भाजपचे विक्रम राजपूत विजयी

प्रभाग क्रमांक- 52 – भाजपच्या प्रीती साटम विजयी

प्रभाग क्रमांक – 33 काँग्रेसचे मोईन सिद्दिकी विजयी

प्रभाग क्रमांक – 1 शिवसेनेच्या रेखा यादव विजयी

प्रभाग क्रमांक – 135 भाजपचे नवनाथ बन विजयी

प्रभाग क्रमांक – 215 भाजपचे संतोष ढोले

प्रभाग क्रमांक – 214 भाजपचे अजय पाटील विजयी

प्रभाग क्रमांक – 19 भाजपचे प्रकाश तावडे विजयी

प्रभाग क्रमांक – 123 शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोरे विजयी

प्रभाग क्रमांक – 50 भाजपचे विक्रम राजपूत विजयी

प्रभाग क्रमांक – 20 भाजपचे दीपक तावडे विजयी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...