ब्रम्हनाळ बोट दुर्घटना : बुडालेल्या महिलांचे 25 तोळे दागिने सापडले

महापुरात सांगलीतील ब्रम्हनाळमध्ये बोट (Bramhanal boat overturn) उलटून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पुरात बुडालेल्या महिलांचे दागिने सापडले आहेत.

ब्रम्हनाळ बोट दुर्घटना : बुडालेल्या महिलांचे 25 तोळे दागिने सापडले

सांगली : महापुरात सांगलीतील ब्रम्हनाळमध्ये बोट (Bramhanal boat overturn) उलटून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पुरात बुडालेल्या महिलांचे दागिने सापडले आहेत. पाणी ओसरल्यानंतर 25 तोळे सोन्याचे दागिने आणि पैसे आढळून आले आहेत. ब्रम्हनाळमधील (Bramhanal boat overturn) म्हसोबा कॉर्नर परिसरात दागिने आणि पैसे सापडले. सापडलेल्या वस्तूंमध्ये सोने, पैसे, एक मोबाईल आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य करत असताना क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे ब्रम्हनाळमध्ये बोट उलटली आणि अनेक जण वाहून गेले. यापैकी काही जणांना वाचवण्यात यश आलं, तर काहींना प्राण गमवावे लागले. सरकारी मदत न पोहोचल्यामुळे या सर्वांना खाजगी बोटीतून वाचवलं जात होतं. पण बोट फांदीला अडकली आणि पलटी झाली.

महापुरानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्हा आता सावरत आहे. राज्यासह देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ येत आहे. सरकारकडूनही पीडितांना मदतीचं वाटप सुरु करण्यात आलंय. या नैसर्गिक संकटामध्ये ब्रम्हनाळच्या घटनेने सर्वांचंच हृदय हेलावून गेलं. नैसर्गिक संकटाचा सामना करताना प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. त्यामुळेच अनेक जण एकदाच या बोटीत बसले आणि मोठी दुर्घटना घडली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *