Nashik | ‘आम्हाला मायदेशी परत आणा’, दिशाची भारत सरकारला आर्त हाक
नाशिकच्या (Nashik) देवळा तालुक्यातील उमराने येथील दिशा वैद्यकीय (Medical) शिक्षणासाठी झेप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन (Ukraine) येथे गेली आहे. तिथे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिच्यासह अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.
नाशिकच्या (Nashik) देवळा तालुक्यातील उमराने येथील दिशा वैद्यकीय (Medical) शिक्षणासाठी झेप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन (Ukraine) येथे गेली आहे. तिथे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिच्यासह अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यासाठी दिशाने व्हिडिओ कॉल करून तिथली माहिती दिली आहे. युक्रेनच्या मध्यवर्ती ठिकाणी ही युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे इतर देशाच्या सीमा या हजारो किमी लांब आहेत. त्यामुळे बाहेर निघणे अवघड आहे. येथील प्रशासन धीर देत आहे. खाद्य सामुग्री साठवून ठेवली असली, तरी किती पुरेल, हा प्रश्न आहे. भारत सरकारने मदत सुरू केली आहे. आम्हाला लवकर मायदेशी परत न्यावे, अशी आर्त हाक दिशाने दिली आहे. दरम्यान भारत सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केले असून मदत कक्षही स्थापन करण्यात आलेत. त्यामाध्यमातून संपर्क साधण्यात येत आहे.
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत...
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले..
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल

