मोठी बातमी! नारायण राणेंना स्टेजवरच आली चक्कर, आवाज बसला, बोलताही येईना, भाषण अर्ध्यावरच सोडलं
मोठी बातमी समोर येत आहे, चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं.

मोठी बातमी समोर येत आहे, चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना चक्कर आल्याची घटना घडली आहे. भाषणादरम्यान नारायण राणे यांना भोवळ आली. राणे यांचं भाषण शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांचा आवाज बसला, तसेच त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. यावेळी राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास देखील नकार दिला. कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले.
दरम्यान त्यापूर्वी वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवात नारायण राणे यांनी नंदीचे दर्शन घेतले. यावेळी राणे यांच्यावर पारंपरिक गीत सादर करण्यात आले. कृषी महोत्सवात राणे दाम्पत्यानं नंदीचं दर्शन घेतलं, त्यानंतर राणे यांनी दक्षिणाही अर्पण केली. वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सव बहाद्दरशेख नाका येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदानात सुरू झाला आहे. ९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले, त्यानंतर सुरू झालेल्या भाषणादरम्यान राणे यांना चक्कर आली, राणे यांचा आवाज बसल्यानं त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं, त्यानंतर ते गेष्टहाऊसच्या दिशेनं रवाना झाले.
राणेंकडून निवृत्तीचे संकेत
दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी माझ्या आयुष्यात राजकारणात जी काही पदे मिळवली ती स्वकर्तृवावर मिळवली आहेत. माझं ध्येय होतं, त्या प्रमाणे मी बदत गेलो. मी लोकसभेवर जाण्यापूर्वी देखील मला तिकीट नको असं मी सांगितलं होतं. मात्र तरीही मला तिकीट मिळालं. मात्र आता असं वाटतं की कुठेतरी थांबायला पाहिजे असे म्हणत राणे यांनी रविवारी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. तसेच त्यांनी निलेश राणे आणि नितीश राणे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी जो वाद निर्माण झाला होता, त्या वादावर देखील भाष्य केलं.
