Asaduddin Owaisi : चार मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला…असदुद्दीन ओवेसी यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर
सभा संपताना असदुद्दीन ओवेसी यांनी बेजबाबदार वर्तन केलं. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केलं.लोक क़ठडे तोडून व्यासपीठाकडे धावलेत. सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने उडाला गोंधळ.

चार मुलं जन्माला घालण्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या विधानाला खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “चार मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतय?. मी सहा जन्माला घातली. दोन लेकरं असली तर महाराष्ट्रात निवडणुका लढवता येत नाहीत, हा नियम आम्ही तेलंगणात बदलून टाकला. मोहन भागवतांच्या उपस्थितीत चंद्रबाबू नायडू तीन पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला असे म्हणतात” असं असुद्दिन ओवेसी यांनी म्हटलय. “अकोल्यात जन्म आणि मृत्यू दाखला देणे बंद केले. भाजप मुस्लिमांचा किती राग करते?. मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचं डोकं का दुखतं?. देशाला विश्वगुरू करण्यासाठी ही कोणती पद्धत” अशी टीका असदुद्दिन ओवेसी यांनी केली.
“शहरातील सधन भागांचा विकास. गरीब भागांचा विकास करतांना हे आंधळे का?. मुस्लिम आणि दलितांकडे एवढे दुर्लक्ष का?. आमच्या 32 लोकांना अकोल्यात निवडून द्या. आम्ही दुर्लक्षित भागात विकास करू” असा शब्द असदुद्दिन ओवेसी यांनी दिला.”मला बिहारमध्ये हरविण्यासाठी दिल्ली, उत्तरप्रदेशातून लोक बोलावले गेले. माझे 5 आमदार आलेत, काँग्रेसशी आघाडी करून 6 आमदार आलेत. लोकसभेत ‘वंदे मातरम’ला विरोध मी केला. भारताच्या संविधानात ‘आम्ही लोक’ म्हटलं, ‘भारतमाता’ नाही म्हटले. या देशाच्या प्रत्येक घटकावर प्रेम करतो. युसूफ मेहेर अली यांनी भारत छोडोचा नारा दिला. मी अल्लाला सोडून कुणाला मानत नाही. देशावर प्रेम करावं हे मला धर्माने शिकवलं” असं असदुद्दिन ओवेसी म्हणाले.
असदुद्दीन ओवेसी यांचं बेजबाबदार वर्तन
अकोल्यातील खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत लाठीचार्ज करावा लागला. सभेला आलेले लोक अनियंत्रित झाल्यामुळे उडाला मोठा गोंधळ. अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती.सभेत कोणतेही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली.सभा संपताना असदुद्दीन ओवेसी यांनी बेजबाबदार वर्तन केलं. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केलं.लोक क़ठडे तोडून व्यासपीठाकडे धावलेत. सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने उडाला गोंधळ.
