मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांची सर्वात मोठी घोषणा, थेट बदलली राजकीय समीकरणे, म्हणाला, परळी आता…
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच मंत्री पंकजा मुंडे यांनी अत्यंत मोठी घोषणा केली असून त्यांनी परळीबद्दल खुलासा केला.

राज्यात महापालिका निवडणुकीचे जोरदार वारे असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. मात्र, यावर्षीच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जवळपास बदलली आहेत. जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होती ती एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा तूफान चर्चेत आला. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणात आरोप झाली आणि थेट धनंजय मुंडे यांनी आपले आरोग्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, याकरिता धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव होता. शेवटी त्यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षानंतर एकत्र आले. परळी नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात धनंजय मुंडेंना यश आले.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिला आहे. परळी हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपाची एकहाती सत्ता परळीत राहिली. गोपीनाथ मुंडेही येथूनच निवडणूक लढवत. मात्र, धनंजय मुंडे एनसीपीत दाखल झाल्यापासून एनसीपीची ताकद वाढली. आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्यानंतर आगामी निवडणुका परळीतून नक्की कोण लढणार यावरून सतत चर्चा होती.
नुकताच आता मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीबद्दल मोठे विधान केले. जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली… आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात… मी परळी इतकेच माळाकोळीवर प्रेम करते. मी आता माळाकोळी सांभाळणार.. परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या… मी त्यांना परळी देऊन टाकली. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या…
मी त्यांना म्हटले तुमचा मतदार संघ आहे तुम्ही प्रेम करा. मी आता माळाकोळीवर प्रेम करते. पंकजा मुंडे यांनी एकप्रकारे अत्यंत मोठे संकेत देऊन टाकले आहेत. माळाकोळीवर गोपीनाथ मुंडे यांचे विशेष प्रेम होते. आता पंकजा मुंडे यांनी माळाकोळीबद्दल मोठे विधान केले. यामुळे नवीन राजकीय समीकरणे बघायला आगामी काळात मिळू शकतात.
