AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच… धक्कायक प्रकरण समोर

पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या मागणीसाठी नवविवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवविवाहितेने सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच… धक्कायक प्रकरण समोर
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 05, 2026 | 2:02 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून हुंड्यासाठी महिलांचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. पिपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या एका महिलेने सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात असल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच सासू आणि सासऱ्यांनी मारहाण केल्यामुळे तिच्यावर संध्या उपचार सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या मागणीसाठी नवविवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरे आणि सासूविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेचा विवाह 24 नोव्हेंबर 2024 रोजी झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका महिन्यांतच सासरकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला, असा आरोप तिने केला आहे. पती राजदीप, सासरे प्रदीप आणि सासू हेमलता यांनी तिला छोट्या-छोट्या गोष्टींवरून शिवीगाळ करणे, जेवण न देणे आणि सतत त्रास देणे सुरू केले.

माहरेच्यांकडून पैशांची मागणी

तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी शेअर मार्केटमधील तोट्याचे कारण सांगून पीडितेकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. दबावाखाली तिने वडिलांकडून ३ लाख रुपये आणून दिले. मात्र, दिवाळीच्या काळात पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.

“पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको”

छळ इतका वाढला की, पीडितेला एक-दोन महिने सासरी येऊ दिले नाही. 21 डिसेंबर 2025 रोजी ती सासरी परतली तेव्हा “पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको” अशी धमकी देऊन तिला घरात प्रवेश नाकारला गेला. यावेळी सासरा प्रदीप याने बेल्टने तर पती राजदीपने बुक्के आणि लाथांनी बेदम मारहाण केली. सासू हेमलतानेही मारहाणीत सहभाग घेतला, असा गंभीर आरोप आहे. या मारहाणीमुळे पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दापोडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?