AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेरे! बापलेकाच्या भांडणात बिचाऱ्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड या गावात ही घटना घडली. | Buffalo died in sangli Maharashtra

अरेरे!  बापलेकाच्या भांडणात बिचाऱ्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू
| Updated on: Mar 14, 2021 | 2:39 PM
Share

सांगली: वडील आणि मुलातील वाद विकोपाला गेल्यामुळे सांगलीत एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू (Buffalo died) झाल्याची घटना घडली आहे. वडिलांशी झालेल्या वादामुळे चिडलेल्या मुलाने म्हशीच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये म्हशीचा मृत्यू झाला. (Buffalo died in sangli Maharashtra due to battle between father and son)

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड या गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर आगा आणि त्यांचा मुलगा सद्दाम झाकीर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर चिडलेला सद्दाम घराशेजारी असलेल्या गोठ्यात गेला. त्याने याठिकाणी असलेल्या म्हशीच्या डोक्यात लोडणे घातले. म्हशीच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये फटका बसल्याने म्हैस जागीच मृत्युमुखी पडली.

या घटनेनंतर सद्दाम झाकीर यांनी आपल्या मुलाविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता सद्दामवर गुन्हा दाखल केला असून सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, 200 जण रुग्णालयात

कोल्हापूर शहराजवळील करवीर तालुक्यातील शिये गावात दोन दिवसांपूर्वी एका म्हशीचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालात रेबीज रोगामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याचे कळताच म्हशीचे दूध प्यायलेल्या शेकडो ग्राहकांची तारांबळ उडाली. त्यांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली.

शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील शिये गाव आहे. या गावातील शिये गावातील हनुमान नगर येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला सहा महिन्यांपूर्वी पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्या म्हशीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात त्या म्हैशीला रेबीज झाल्याचे समोर आले. गावातील शेकडो ग्रामस्थ या म्हशीचं दूध वापरत होते. त्यामुळे रेबीजमुळे म्हशीचा मृत्यू झाला हे कळताच ग्रामस्थांची बोबडीच वळली. भीतीपोटी शेकडो ग्रामस्थांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली. तब्बल 200 ग्रामस्थांनी रेबीजची लस घेतली असल्याची माहिती आहे.

(Buffalo died in sangli Maharashtra due to battle between father and son)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.