AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रकमध्ये चढण्यासाठी उभ्या राहिल्या, अचानक एसटी आली अन्…; रोजीरोटीच्या शोधात आलेल्या महिलांवर काळाचा घाला

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे भीषण अपघात घडला. मजुरीसाठी आलेल्या दोन परराज्यातील महिला मजुरांचा एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाले. कापूस वेचणीसाठी पिकअपमध्ये चढत असताना भरधाव एसटीने मागून धडक दिली.

ट्रकमध्ये चढण्यासाठी उभ्या राहिल्या, अचानक एसटी आली अन्...; रोजीरोटीच्या शोधात आलेल्या महिलांवर काळाचा घाला
buldana accident
| Updated on: Dec 12, 2025 | 10:49 AM
Share

पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीच्या शोधात आलेल्या परराज्यातील २ महिला मजुरांवर काळाने घाला घातला. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह अमरावती आणि मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देऊळगाव राजा येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू पिकअपला भरधाव एसटी बसने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २ महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर अन्य पाच मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत.

एसटी बसची मालवाहू पिकअपला धडक

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये अमरावती जिल्ह्यासह मध्य प्रदेशातून अनेक महिला मजूर वास्तव्यास आहेत. त्या रोजीरोटीसाठी दररोज आजूबाजूच्या शेतांमध्ये कापूस वेचणीच्या कामासाठी जातात. गुरुवारी सकाळी या महिला कापूस वेचण्यासाठी पिंपळगाव येथे जाण्यासाठी एका मालवाहू पिकअप वाहनामध्ये चढत होत्या. या महिला पिकअप वाहनात चढत असतानाच जाफराबाद-जालना मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने या मालवाहू पिकअपला मागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले.

दोघांचा मृत्यू

या अपघातात पिकअपमध्ये चढणाऱ्या दोन महिला मजुरांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. मायाबाई सुरज काजले (३२) आणि रिचाय काल्या कासदेकर (७२) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सुहाना प्रतिराम इपने, खुशबू बबलू पालवी, सुलोचना हारासिंग सहारे, रोशनी मंगल इपने, नर्मदा सोनू इपने हे ५ जण गंभीर जखमी झाले.

५ जण गंभीर जखमी

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५ मजुरांना तातडीने देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारांसाठी जालना येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मजुरीच्या शोधात आलेल्या कुटुंबांवर ओढावलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.