AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : समलैंगिक संबंधांतून 47 वर्षीय कक्षसेवकाची हत्या, तरुणाने संबंध ठेऊन केलं चित्रीकरण, खंडणी न दिल्याने पाठवलं यमसदनी

47 वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधांतून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये आधी तरुणाने संबंध ठेवले, त्यानंतर मित्रांच्या मदतीने चित्रकरण करुन संबंधित इसमाला खंडणी मागीतली. खंडणी न दिल्यानं तरुणानं मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची ही धक्कादायक घटना आहे.

Crime : समलैंगिक संबंधांतून 47 वर्षीय कक्षसेवकाची हत्या, तरुणाने संबंध ठेऊन केलं चित्रीकरण, खंडणी न दिल्याने पाठवलं यमसदनी
संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकलेImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 1:31 PM
Share

बुलडाणा : 47 वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधांतून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा (buldhana) शहर पोलिसांनी (Police) उघडकीस आणला आहे. हत्या (Murder) करणाऱ्या सात आरोपीविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीराम पांडुरंग शेळके असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मंदिराच्या कमानीजवळ एका मोकळ्या शेतात एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीला आधी बुलडाणा आणि त्यानंतर औरंगाबाद येथे हलवले. जखमी व्यक्ती हा पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक असलेला श्रीराम शेळके असल्याची ओळख पटली होती. 3 एप्रिलला औरंगाबाद येथे उपचारादरम्यान श्रीराम शेळके यांचा मृत्यू झाला होता.  याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. पोलिसांनी तपासादरम्यान मृतक श्रीराम शेळके यांच्या कुटुंबीयांची तसेच तो काम करत असलेल्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर अनेक खुलासे समोर आले आहेत.

फेसबूकवरुन मैत्री

गेल्या तीन महिन्यांपासून श्रीराम शेळके याला सतत कुणाचा तरी फोन यायचा तो त्यावर सतत बोलायचा आणि त्यानंतर अस्वस्थ व्हायचा असे पोलिसांसमोर आले. पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत महत्वपूर्ण माहिती गोळा केली.  मृतक श्रीराम शेळके हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक पदावर कार्यरत होता. बुलडाणा शहरातील सावित्रीबाई फुले नगरात राहणाऱ्या आनंद गवई (19) याच्याशी काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवरून ओळख झाली होती. दोघांमध्ये फेसबुकवर चॅटिंग होत होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईलवर आनंद आणि श्रीराम यांचे सातत्याने बोलणे व्हायचे. दोघांमध्ये व्हॉट्स एप्सवरून समलैंगिक संदेश, फोटो तसेच व्हिडीओची देवाणघेवाण होत होती. त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक निर्माण झाली होती.

 व्हिडीओ काढून पैशांची मागणी

29 मार्च 2022 रोजी आनंदने श्रीरामला बुलडाण्याला भेटायला बोलावले आणि खामगाव रोडवरील कोठारी शोरुमजवळ दोघांची भेट झाली. त्यादिवशी आनंदचा मित्र शाश्वत यांच्या घरी कुणी नसल्याने घराची चाबी आनंदने घेऊन ते दोघेही शाश्वतच्या घरी गेले. आनंदचा मित्र आदेश राठोड याला ही बाब माहीत झाल्याने त्याने हा प्रकार शाश्वतला सांगितला. आदेश आणि शाश्वतने घराच्या मागच्या दरवाजाने गुपचूप प्रवेश केला त्यावेळी आनंद आणि श्रीराम यांच्यात समलैंगिक संबंध सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. या संबंधाचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले आणि त्यानंतर लगेच खोलीत शिरून तो व्हिडिओ श्रीराम शेळके याला दाखवला आणि व्हिडीओ व्हायरल करायचा नसेल तर पैशांची मागणी केली.

पैशास नकार दिल्याने मारहाण

श्रीरामने पैसे द्यायला नकार दिल्याने आदेश आणि शाश्वतने त्यांचे मित्र चेतन वावरे , संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांना तिथे बोलावले. यावेळी सगळ्यांनी मिळून श्रीरामला बेदम मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील श्रीरामला शाश्वतच्या चारचाकी वाहनात टाकून दुपारी साडेचारच्या सुमारास मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या मोकळ्या शेतात टाकून दिले. तिथेच श्रीरामची मोटरसायलकल सुद्धा आरोपींनी उभी करून दिली. तेथून सर्वांनी पलायन केले. मात्र, रात्री साडेदहाच्या सुमारास फिरायला गेलेल्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमी श्रीरामला आधी बुलडाणा आणि त्यानंतर औरंगाबाद रेफर केलं. मात्र, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यावर आपली तापसचक्रे फिरवीत आनंद गवईला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता आनंद ने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.  याप्रकरणी आनंद गवई, शाश्वत खंदायता, आदेश राठोड, चेतन वावरे, संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्या

आता मुंबईकरांना बीडीडी चाळीतही मिळणार घर; निधी उभारण्यासाठी म्हाडाचा उपक्रम

Video: ‘होय, शरद पवार साहेब खोटं बोलले’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?

‘5 रंगांचा झेंडा एका रंगाचा कसा झाला?’, Shrimant Kokate यांचा Raj Thackeray यांना सवाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.