तीन दिवसांपासून 11 महिन्याच्या बाळासह पती-पत्नीचे उपोषण, अधिकारी-कर्मचारी करतायेत बर्थ डे सेलिब्रेशन

| Updated on: Sep 29, 2022 | 6:01 PM

एक दांपत्य आपल्या अकरा महिन्याच्या मुलीसह गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यापेक्षा वाढदिवसाचे सेलिब्रेशन महत्वाचं होतं.

तीन दिवसांपासून 11 महिन्याच्या बाळासह पती-पत्नीचे उपोषण, अधिकारी-कर्मचारी करतायेत बर्थ डे सेलिब्रेशन
तीन दिवसांपासून 11 महिन्याच्या बाळासह पती-पत्नीचे उपोषण
Image Credit source: TV9
Follow us on

बुलढाणा / गणेश सोलंकी (प्रतिनिधी) : आपल्यावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी किंवा आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषणाचा (Uposhan) पवित्र घेतला जातो. मात्र न्याय देणारे अधिकारीच याकडे दुर्लक्ष (Ignorance of the Authorities) करत असतील, तर मग न्याय नेमका मागावा कुणाकडे ? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचे कारणही तसेच असून न्यायासाठी एक उपोषण गेल्या तीन दिवसापासून बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर (Buldhana Zilla Parishad) सुरू आहे.

बुलढाण्यातील जिल्हा परिषद कार्यालयात संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एक दांपत्य आपल्या अकरा महिन्याच्या मुलीसह गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यापेक्षा वाढदिवसाचे सेलिब्रेशन महत्वाचं होतं.

26 सप्टेंबरपासून सुरु आहे उपोषण

काकणवाडा येथील निलेश तायडे आणि पत्नी अस्मिता तायडे या पती-पत्नीने आपल्या 11 महिन्याच्या मुलीसह बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर 26 सप्टेंबरपासून उपोषणास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

तीन दिवस झाले तरी मॅडमच्या वाढदिवसाचा फिवर उतरण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशीही जिल्हा परिषद प्रशासनाने या जोडप्याच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

काय आहे प्रकरण ?

संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक पदासाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. या जाहिरातीनुसार अस्मिता तायडे यांनी अर्ज केला होता. अस्मिता यांच्याकड विहित शैक्षणिक पात्रताही होती.

अस्मिता यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची मुलाखतही झाली. मुलाखतीनंतर नियुक्ती पत्र येणे बाकी असताना ग्रामपंचायतीने ही भरतीच रद्द केली. यानंतर ग्रामपंचायतीने या पदासाठी नव्याने भरतीची जाहिरात काढली.

मात्र या पदासाठी आपला अर्ज मंजुर झाला, मुलाखतही झाली. त्यामुळे आपली नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करत नोकरीत न्याय मिळवण्यासाठी हे दाम्पत्य 11 महिन्याच्या बाळासह गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसले आहे.

जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचं कृत्य लज्जास्पद

मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मॅडमच्या वाढदिवसाच्या जल्लोषात या गरीब कुटुंबाचं उपोषण सर्वांनीच बेदखल केल्याचे लज्जास्पद कृत्य उघडकीस आलं आहे. या गरीब कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला शुभेच्छा देणे, त्यांची सरभराई करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे दिसून आले.