Buldana petrol | बुलडाण्यात एचपीच्या पंपांवर पेट्रोल, डिझेल नाही; दोन दिवस इतर पंपांवर गर्दी

गायगाव येथील डेपो येथे पेट्रोलची व्हॅगन ट्रेन आली नव्हती. म्हणून दोन दिवस कुत्रीम तुटवडा होता. काल व्हॅगन आली. आज संध्याकाळी व्हॅगन येणार आहे. त्यामुळं कुठेही पेट्रोल टंचाई नाही. व्हॅगन येण्यास विलंब झाल्यास पेट्रोल सप्लाय थोडा कमी करतात, अशी माहिती आहे.

Buldana petrol | बुलडाण्यात एचपीच्या पंपांवर पेट्रोल, डिझेल नाही; दोन दिवस इतर पंपांवर गर्दी
बुलडाण्यात एचपीच्या पंपांवर पेट्रोल, डिझेल नाही
Image Credit source: t v 9
गणेश सोळंकी

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 21, 2022 | 6:09 PM

बुलडाणा : बुलडाण्यात काल, परवा दोन दिवस एचपीच्या पेट्रोल (HP’s pumps) पंपांवर पेट्रोल, डिझेल मिळत नव्हते. त्यामुळं इतर पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी (Crowd) केली. यासंदर्भात पेट्रोल पंपचालकांना विचारलं असता पुरवठा झाला नसल्यानं साठा संपल्याचं त्यांनी सांगितलं. गायगाव (Gaigaon) येथील डेपोतून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. परंतु, व्हॅगन दोन दिवस आली नसल्यानं पंपचालकांनी पेट्रोल संपल्याचं सांगितलं असेल. पेट्रोलची कमतरता नाही. हा कृत्रीम टंचाईचा प्रकार दिसतो, असं गायगाव येथील पेट्रोल सप्लाय करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काल व्हॅगन आली नव्हती याचा अर्थ पेट्रोल संपला असा होत नाही. एखाद दिवस व्हॅगन उशिरा होत असते. पण, पेट्रोल पंपचालक पुढं आपल्याकडं राखीव साठा राहावा, यासाठी अशाप्रकारे पेट्रोल, डिझेल संपल्याचं सांगत असतात. कृत्रीम टंचाई निर्माण करत असतात, असं गायगाव येथील अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली.

गायगाव येथील डेपोत पुरेसा साठा

यासंदर्भात अकोल्याचे प्रतिनिधी गणेश सोनोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायगाव येथील डेपो येथे पेट्रोलची व्हॅगन ट्रेन आली नव्हती. म्हणून दोन दिवस कुत्रीम तुटवडा होता. काल व्हॅगन आली. आज संध्याकाळी व्हॅगन येणार आहे. त्यामुळं कुठेही पेट्रोल टंचाई नाही. व्हॅगन येण्यास विलंब झाल्यास पेट्रोल सप्लाय थोडा कमी करतात, अशी माहिती आहे.

व्हॅगन उशिरा आल्याने गैरसमज

बुलडाण्यात गेल्या दोन दिवसांपासून एचपीच्या पंपांवर पेट्रोल नाही. त्यामुळं गर्दी वाढली होती. गायगाव येथे अकोला जिल्ह्यातील डेपो आहे. येथून पेट्रोल वितरित होतं. तिथून दोन दिवस पेट्रोल, डिझेल आलं नव्हतं. एखाद्या दिवशी व्हॅगन येत नाही. दोन ऐवजी एक व्हॅगन देतो. चार ऐवजी दोन व्हॅगन देतो. त्यामुळं काही पेट्रोल पंपमालकही पेट्रोल राखून ठेवण्यासाठी पेट्रोल संपल्याचं सांगतात.

पेट्रोलसाठी नागरिकांची धावाधाव

लग्नसराईचा सीजन सुरू आहे. दुचाकी-कारसाठी पेट्रोल लागतो. शेतकऱ्यांना टॅक्टरसाठी डिझेल लागतं. पेट्रोल, डिझेल हे पुरेशा प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. दोन दिवस पेट्रोल पंपांवर लाईन लागल्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक पंप बंद होते. तर इंडियन ऑईल पंपावर वाहनांची गर्दी होती.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें