Buldana | आमदार संजय कुटे यांचे शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का?

भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का?, असा सवाल आमदार संजय कुटे यांनी पोलिसांना विचारला. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनावर डॉ. संजय कुटे यांनी गंभीर आरोप केलेत.

Buldana | आमदार संजय कुटे यांचे शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का?
शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप करताना आमदार संजय कुटेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:01 AM

बुलडाणा : आमदार संजय कुटे (Sanjay Kute) म्हणाले, शेगाव (Shegaon) शहरात पोलिसांकडून काही घटना घडल्या. त्यात भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यात कलम 353 ही कलम हमखास लावली जाते. पोलीसच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे. असा आरोप करत अशा गुन्ह्याची तपासणी वरिष्ठ अधिकारी (Senior officer) यांनी करावी. तसेच सदर कलम मागे घ्यावे, अशी मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगावात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलीय. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी शेगाव शहरात धरणे आंदोलन करण्यात येईल. सोमवारी जिल्हाभर तहसील कार्यलयाला निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा ही यावेळी करण्यात आलीय.

शेगाव पोलीस हेतुपुरस्पर कारवाई करतात?

शेगाव शहरात श्रीराम नवमी निमित्ताने काही दिवसांपासून खामगाव रोडवरील मार्केट यार्ड तसेच हॉटेल एमटीडीसी येथे आनंद मेला सुरू आहे. यामध्ये 13 एप्रिल रोजी रात्री याठिकाणी रामाचे गाणे लावं असे समोर म्हणून मेला चालकास आणि त्याचे पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले. दोन्हीकडील व्यक्ती तक्रार देण्यास तयार नसताना तसेच प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यास तयार असताना शहर पोलिसांनी हेतुपुरस्सर स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई केली, असा आरोपही संजय कुटे यांनी केलाय.

आम्हाला कोर्टात न्याय मिळतो

काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयावर विश्वास नसल्याचे टीका केली होती. मात्र भाजप आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी याच विधानाची एकप्रकारचे पुष्टी केल्याचे दिसतंय. कारण शेगावमध्ये स्थानिक एका मुद्द्यावर कुटे यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांना मोठ्मध्ये नेत्यांना पोलीस आणि कोर्टाकडून दिलासा मिलतोय. मग सर्वसामान्य लोकांना का मिळत नाही. त्यावर कुटे म्हणाले की पोलीस प्रशासन, न्याय प्रशासन आमच्या विराधात कितीही वापरल्या तरी आम्ही प्रोटेस्ट करू. वेळप्रसंगी कोर्टात जाऊ, कोर्ट आमच्यासाठी सर्वकाही आहे. कोर्टात आम्हाला न्याय मिळतोय. कोर्टात या विषयाचे काय करायचे ते आम्ही करू. कारण कोर्टात बऱ्याच गोष्टी करता येतात आणि कोर्टात आम्हाला माहिती आहे काय होते. ते आम्ही करू, असे विधान कुटे यांनी केलंय. त्यामुळे कुटे याना नेमके काय म्हणायचे आहे?

Ph.D : ‘पीएचडी’ वाल्यांसाठी नोकरी ! परीक्षा द्यावी लागणार नाही, 5 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख, ‘या’ पत्त्यावर अर्ज पाठवा

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य

Video Raju Karemore | भंडाऱ्यात जय भीमच्या तालावर थिरकले आमदार, राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरेंचा डान्स एकदा बघाच…

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.