AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Theft : बुलडाण्यातल्या चिखलीत जबरी दरोडा, दागदागिन्यांसह रोकडही पळवली

चिखली शहरातील संभाजी नगर भागातील विष्णू बळीराम राऊत यांच्या घरात सोमवारी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास जबरी चोरी करण्यात आली. यामध्ये वडिलोपार्जित दागदागिन्यांसह सुमारे 10 लाख रुपयांपर्यंतचा ऐवज चोरट्यांनी पळवला असल्याचे समजते.

Buldhana Theft : बुलडाण्यातल्या चिखलीत जबरी दरोडा, दागदागिन्यांसह रोकडही पळवली
बुलडाण्यातल्या चिखलीत जबरी दरोडाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 8:40 PM
Share

बुलडाणा : गेल्याच आठवड्यात सीसीटीव्हीत कैद दरोडेखोरांच्या चित्रफितीमुळे संभाजीनगर परिसरात दहशतीचे वातावरण असतानाच सोमवारी पुन्हा एकदा जबरी चोरी (Theft)ची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 3 वाजता संभाजी नगर भागातील एका घरात जबरी चोरी केली. चोरट्यांनी सुमारे 10 लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने (Jewelery) आणि 2 हजार रुपये नगदी ऐवज चोरला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. सलग झालेल्या चोरीच्या दोन घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Robbery in the chikhali in Buldana, cash along with jewelery stolen)

घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला

चिखली शहरातील संभाजी नगर भागातील विष्णू बळीराम राऊत यांच्या घरात सोमवारी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास जबरी चोरी करण्यात आली. यामध्ये वडिलोपार्जित दागदागिन्यांसह सुमारे 10 लाख रुपयांपर्यंतचा ऐवज चोरट्यांनी पळवला असल्याचे समजते. विष्णू राऊत हे घराला बाहेरील बाजूस कुलूप लावून घराच्या छतावर झोपले होते. यादरम्यान रात्री 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत राऊत यांचा मुलगा धनंजय झोपलेला होता त्याच्या पायाकडील बाजूच्या कपाटाची तोडफोड करीत चोरट्यांनी सुमारे सोने चांदीचे दागिने आणि 2 हजार रुपये नगदी स्वरूपाचा ऐवज चोरला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. (Robbery in the chikhali in Buldana, cash along with jewelery stolen)

सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.