AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Gaikwad: तसले हिजडे धंदे करत नाही, तुमच्या घरात चौकशी करा, संजय गायकवाडांची टीका करताना घसरली जीभ, टार्गेटवर कोण?

Sanjay Gaikwad on MLA Shweta Mahale : गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि शिंदेसेनेतील वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे. दोन्ही बाजूंनी वार प्रतिवार सुरू आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. काय आहे प्रकरण?

Sanjay Gaikwad: तसले हिजडे धंदे करत नाही, तुमच्या घरात चौकशी करा, संजय गायकवाडांची टीका करताना घसरली जीभ, टार्गेटवर कोण?
संजय गायकवाडImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 12:15 PM
Share

Sanjay Gaikwad on MLA Shweta Mahale : सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत धुसफुस सुरू आहे. दोन्ही पक्षातील बेबनाव आता निर्माण झालाय असे नाही तर यापूर्वीपासूनच दोन्ही पक्षात भांड्याला भांडे लागत आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिलेदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. तर त्यांचं आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. एका सभेत आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका केली आहे. आमचे सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे आणि विषय खातम करायचा,मागून पाठीत खंजीर खुपसायचे आम्हाला जमत नाही . तर आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार,आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही असे आव्हान त्यांनी महाले यांना दिले.

तसेल हिजडे धंदे करत नाही

मी पण एक आमदार आहे, महाराष्ट्रात देशांत माझे नाव आहे, पण एक माणूस सांगणार नाही की आमदार गायकवाड यांचा त्रास आहे म्हणून . चिखलीच्या आमदार म्हणतात की आमदार गायकआड यांनी माहितीच्या अधिकार टाकून सरपंचावर दबाव आणून प्रवेश घेतला . मात्र माहितीच्या अधिकारासारखे मी हिजडे धंदे कधीच करत नाही, टीका करताना गायकवाड यांची अशी जीभ घसरली. हे मी नाही करत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा ,कोण करता आहे ते, आमचे सरळ सरळ काम आहे , छातीला छाती भिडवायची आणि विषय खातम करायचा, मागून पाठीत खंजीर खुपसायचा आम्हाला जमत नाही. अशाप्रकारची टीका पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेवर केली. दोन दिवसांपूर्वी सुद्धा आमदार गायकवाड यांनी आमदार महालेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देत आमदार महाले यांनी सुद्धा आमदार गायकवाड हे दबाव टाकून प्रवेश करून घेत असल्याचे म्हटले होते.

श्वेता महाले नातेवाईकांना धमक्या देतात

आम्ही चिखली मध्ये आलो ते आमचा पक्ष वाढवण्यासाठी, खासदार यांना कमी पडलेली मात्र वाढवण्यासाठी, जिल्हा परिषदचे जागा जिंकण्यासाठी. चिखली तालुक्यात माझे असंख्य नातेवाईक , पण माझ्याविषयी त्यांनी काही चांगले पोस्ट केली की त्याला धमकी देतात. आमच्या शिवसैनिकाला धमकी देतात. आतापर्यंत पाच सहा वेळा आमच्या शिवसैनिकांनी भाजपा आमदार निवडून आणला, आताही आणला, आणि त्याने काही काम सांगितले की त्याला म्हणताय आमच्या पक्षात प्रवेश घ्या, कोणत्याही कार्यकर्त्याने काम सांगितले की त्याला पक्ष सोडा म्हणतात असा आरोप गायकवाड यांनी भाजप आमदार महाले यांच्यावर केला. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे . शिवसेना चिरडायला निघत असेल तर आम्ही तो त्रास दूर करायला आलो आहे, विधानसभा लढायला नाही. आता आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही अशी खोचक टीकाही त्यांनी महाले यांच्यावर केली.

माझ्या न्यायालयात एकच तारीख

“न्यायालयात 20 – 25 वर्षे खटले चालतात, माझ्या कार्यालयात फक्त एकच तारीख होते. त्याच दिवशी अर्ग्युमेंट त्याच दिवशी जजमेंट आणि खतम. लगेच न्याय निवाडा होतो.. नाहीतर मग आमचा धर्मवीर आखाडा आहेच. आमच्या स्टाईलने संसार बसवतो.” आमदार संजय गायकवाड यांनी असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

तर इतर नेते बुवाबाजीत पैसे गमावतात

बुलढाण्यातील चिखली मतदारसंघातील विविध गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा काल शिंदेंच्या शिवसेनेत आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा प्रवेश झाला. यावेळी संजय गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या 35 कोटी रुपयांच्या कमिशनच्या बाबतीत स्पष्टोक्ती दिली आहे ते म्हणाले की “मी खरं बोलतो पत्रकारांना बोलावच लागतं. पण खरंच मी ते केलंय, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?