AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: भिडे गुरुजी आपण या, आपण दोघेही मिळून खरातला संपवू , माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ, प्लॅन काय?

Big Appeal to Bhide Guruji: अशोक खरात याच्याविरोधात समाजात संतापाची लाट आहे. तर त्याला साथ देणाऱ्या नेत्यांवरही मोठा रोष आहे. शिवप्रतिष्ठाण संघटनेचे प्रमुख मनोहरराव भिडे यांनी सुद्धा याप्रकरणी त्यांचा संताप व्यक्त केला. आता माजी मंत्र्यांने त्यांना सोबत येण्याची आणि खरातला संपवण्याची भाषा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat: भिडे गुरुजी आपण या, आपण दोघेही मिळून खरातला संपवू , माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ, प्लॅन काय?
मनोहर भिडे, अशोक खरातImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 11:18 AM
Share

Subhod Savaji on Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने अनेकांचे जीवन नासवले. 150 हून अधिक महिलांचे त्याने लैंगिक, आर्थिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जमिनी लाटल्या. भूखंड हडपले असा आरोप करण्यात येत आहे. खरातविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. विरोधी पक्षच नाही तर अनेक संघटनांनी त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर शिवप्रतिष्ठाण संघटनेचे प्रमुख मनोहरराव भिडे यांनी सु्द्धा याप्रकरणात त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. तर याच प्रकरणात आता भिडे यांना एका माजी मंत्र्यांने मोठे आवाहन केले आहे. त्यांनी खरात याला संपवण्यासाठी भिडे गुरुजी यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भिडे गुरूजी आपण या, दोघेही मिळून खरातला संपवू

भिडे गुरुजी आपण या , मी आपणास सोबत येतो. आपण दोघेही मिळून खरातला संपवू असे वक्तव्य बुलढाण्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले आहे. भिडे गुरुजी यांच्या भोंदू अशोक खरातच्या वक्तव्याला माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पाठिंबा दिला आहे. भोंदू बाबा अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावं, या भिडे गुरुजी यांचा वक्तव्याला माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पाठिंबा दिला आहे. सावजी म्हणतात की, भिडे गुरुजी आपणास विनंती करतो की , आपण या ,मी आपल्या सोबत येतो, आपण दोघेही मिळून खरातला संपवू . त्यांनी एकप्रकार भिडे गुरुजी यांचे वक्तव्याला पाठिंबा दिला आहे . त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एका लोकप्रतिनिधीने बँकेची जागा बदलली

भोंदू अशोक खरात याच्या सांगण्यावरून एका लोकप्रतिनिधीने बँकेची जागा बदलल्याचा दावा करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदवड यांनी हा दावा केला आहे. नाशिक जिल्हा बँक नाशिकच्या द्वारका परिसरातून सीबीएस येथे स्थलांतरित केली. भोंदू अशोक खरात यांच्या सांगण्यावरूनच बँकेची जागा बदलण्याचा संशय व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याविषयीचे पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीत सत्यता आल्यास लोकप्रतिनिधींचे नाव उघड करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांपासून भोंदू अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून अजून बरीच माहिती समोर यायची आहे. त्याने आतापर्यंत काय काय कबुलीजबाब दिला याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्याची पोलीस कोठडी उद्या संपत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?