Azadi ka Amrit Mahotsav : ढोलाच्या तालावर आदिवासी नृत्यावर अधिकारी थिरकले, विद्यार्थ्यांचा आदिवासी पोशाख सर्वांच्या नजरेत भरला

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागात ही याची जनजागृती करण्यासाठी प्रशासनाचे आधिकारी कर्मचारी फिरताना दिसत आहेत.

Azadi ka Amrit Mahotsav : ढोलाच्या तालावर आदिवासी नृत्यावर अधिकारी थिरकले, विद्यार्थ्यांचा आदिवासी पोशाख सर्वांच्या नजरेत भरला
Swatantryacha Amrut Mahotsav : ढोलाच्या तालावर आदिवासी नृत्यावर अधिकारी थिरकले, विद्यार्थ्यांचा आदिवासी पोशाख सर्वांच्या नजरेत भरला
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 10, 2022 | 10:03 AM

बुलढाणा : अधिकारी थिरकले आदिवासींसोबत नृत्यासह ढोलाच्या तालावर असं चित्र तुम्ही कधी पाहिलं आहे का ? परंतु अनेक अधिकाऱ्यांना एखाद नृ्त्य किंवा ढोल वाजायला सुरुवात झाल्यावर राहावतं नाही. तसाच प्रकार आदिवासी भागातील चारबन येथे पाहायला मिळाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या (Swatantryacha Amrut Mahotsav) कार्यक्रमात अधिकारी थिरकले आहेत. तसेच त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. तिथं नाचत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत (Student) अधिकाऱ्यांनी ठेका धरल्याने कार्यक्रमाला मोठी रंगत आली होती. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील आदिवासी भागात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची जनजागृती करण्यासाठी प्रशासनाचे आधिकरी कर्मचारी फिरताना दिसत आहेत. तसेच त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा

आदिवासी भागातील चारबन येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जळगांव तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागातील चारबन येथे स्वातंत्र्याचा अमृतोत्सव तसेच जागतिक आदिवासी दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह गावकाऱ्यांसोबत आदिवासी नृत्यावर नाचत कार्यक्रमांची रंगत वाढवली आहे.

हे सुद्धा वाचा

चारबनच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी पोशाख सर्वांच्या नजरेत भरत

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागात ही याची जनजागृती करण्यासाठी प्रशासनाचे आधिकारी कर्मचारी फिरताना दिसत आहेत. जळगांव जामोद तालुक्यातील आदिवासी गाव असलेले चारबन येथे गावातून आदिवासी सोबत तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी चारबनच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी पोशाख सर्वांच्या नजरेत भरत होता. यावेळी आदिवासी लोकांसोबत एस डी ओ, तहसीलदार, सह इतर कर्मचारी यांनी सुद्धा आदिवासी सोबत ढोल वाजवीत नृत्याचा ठेका धरला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें