AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्या कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचेही तुकडे करतील’; उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

"मिंदे मुख्यमंत्री शेपूट हात घालून सांगतील, अरे जाऊ द्या ना ४० गावे द्यायची आहेत ना. देऊन टाकू. पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो. बसा बोंबलत", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

'उद्या कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचेही तुकडे करतील'; उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
| Updated on: Nov 26, 2022 | 7:13 PM
Share

बुलढाणा : “आपल्या छत्रपतींचा आपमान सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाटी गुजरातमध्ये वळले. का नेताय? तर गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या . कालपरवा बोम्मई बोंबललेत . त्यांनी सोलापूरवर हक्क सांगितला. अक्कलकोटवर हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निडणुका आहे. मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे”, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

“मिंदे मुख्यमंत्री शेपूट हात घालून सांगतील, अरे जाऊ द्या ना ४० गावे द्यायची आहेत ना. देऊन टाकू. पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो. बसा बोंबलत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. इकडचे उद्योग न्यायचे म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा. इथे बेकारी वाढेल. तरुणांना बेकार ठेवायचं. छत्रपतींचा अवमान करून आदर्श तुडवायचे. आपल्या पंढरपुरचा विठोबा कर्नाटकात जाणार?”, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातात.

तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.

भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही.

संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.

तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.