‘देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’; उद्धव ठाकरे यांचा वीज बिल माफीवरून फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला

"सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केले जात आहे. काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा", असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

'देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा'; उद्धव ठाकरे यांचा वीज बिल माफीवरून फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 7:12 PM

बुलढाणा : “राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑडिओ ऐकवला. मध्यप्रदेशात वीज बिल माफ करावे. सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केले जात आहे. काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याती शेतकरी संवाद मेळाव्यात केला. यावेळी उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदे गटावर चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले.

“या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे. त्या ठिकाणी मध्यप्रदेशने वीज बिल माफ केले. या ठिकाणी त्या ठिकाणी करता ना… आता आव्हान आहे. तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. आता वीज बिल माफ करून दाखवा. आता होऊनच जाऊ द्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. आम्ही कर्जमाफी केली होती. तुम्ही कर्जमाफी केली. कुणी किती केली त्यावर बोलायला या मैदानात. मी चर्चेला तयार आहे. फक्त पश्चिम विदर्भात थोडी बाकी होती”, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

“आपल्या छत्रपतींचा आपमान सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाटी गुजरातमध्ये वळले. का नेताय? तर गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या . कालपरवा बोम्मई बोंबललेत . त्यांनी सोलापूरवर हक्क सांगितला. अक्कलकोटवर हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निडणुका आहे. मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे”, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

“मिंदे मुख्यमंत्री शेपूट हात घालून सांगितली. अरे जाऊ द्या ना ४० गावे द्यायची आहेत ना. देऊन टाकू. पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो. बसा बोंबलत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. इकडचे उद्योग न्यायचे म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा. इथे बेकारी वाढेल. तरुणांना बेकार ठेवायचं. छत्रपतींचा अवमान करून आदर्श तुडवायचे. आपल्या पंढरपुरचा विठोबा कर्नाटकात जाणार?”, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातात.

तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.

भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही.

संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.