AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरसेविकेचा विनयभंग, रस्त्यातच अडवलं अन्…, कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आला आहे, या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेविकेचा विनयभंग, रस्त्यातच अडवलं अन्..., कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार
नगरसेविकेचा विनयभंग Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 22, 2026 | 10:58 AM
Share

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी सोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह देखील या व्यक्तीने संबंधित नगरसेविकेकडे धरला होता, असंही तक्रारीमध्ये म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे, सत्तेत असलेल्या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आल्याने या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रभागात कचरा साचला आहे, प्रभागामधील कचरा का उचलला गेला नाही? या रागातून नगरसेविकेला भररस्त्यात अडून नगरसेविकेचा विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी तानाजी आनंदराव जाधव याच्याविरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी संबंधित नगरसेविकेच्या घरी जाऊन, कचरा पडलेल्या ठिकाणी चला, छायाचित्र काढायची आहेत, असं म्हणत हा व्यक्ती सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तक्रार प्राप्त होताच तानाजी जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित नगरसेविका या आपल्या काही कांमासाठी सकाळच्या सुमारास कुठेतरी बाहेर जात असताना या वक्तीने त्यांना अडवलं, तसेच त्यांच्या वडिलांना देखील शिवीगाळ करण्यात आली, तानाजी जाधव याने यावेळी अश्वील हावभाव देखील केले. मी तुला बघून घेईल असं म्हणत या नगरसेविकेला त्याने धमकावलं देखील, त्यानंतर आता या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या भागातील काही महिलांच्या देखील त्याच्याविरोधात तक्रारी आहे, आम्ही कचरा टाकण्यासाठी आलो असता, तो आमचे व्हिडीओ बनवतो, असं या महिलांनी म्हटलं आहे. आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?