Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; अखेर CBI ने ते पाऊल उचललंच
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सीबीआयने सोमवारी एफआयआर दाखल केली आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता सीबीआयने सोमवारी एफआयआर दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने दिशाच्या वडिलांच्या याचिकेवरून सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयकडून सामूहिक अत्याचार, हत्या आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या वडिलांच्या जबाबात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. त्याचबरोबर रिया चक्रवर्ती, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझेचंही नाव आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडली आहे.
दिशा सालियन प्रकरणात कोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासावर अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यावेळी सहा वर्षांत एफआयआर नोंदवण्यात आली नसल्याने कोर्टाने सवाल उपस्थित केले होते. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दोनवेळा तपास केला. त्यानंतर केवळ अपघात असल्याचे पोलिसांनी म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईच्या मालाडमधील एका 14 मजली इमारतीवरून पडून झाला होता. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर म्हणजे सहा दिवसांनंतर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह याने मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी आयुष्य संपवलं होतं. दिशा सालियन प्रकरणाची फाइल पहिल्यांदा तीन महिन्याच्या तपासानंतर बंद करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगेळे दावे करण्यात येऊ लागले होते. त्यानंतर 2003 साली पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
एफआयआर दाखल होण्यासाठी सहा वर्षापासून पाहत होतो वाट – सतिश
दिशाचे वडील सतिश सालियन यांनी आरोप केला होता की, ‘दिशावर सामूहिक अत्याचार झाला, त्यानतंर तिची हत्या झाली. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासहित इतर लोकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यावर त्यांनी म्हटलं की, मी सहा वर्षांपासून वाट पाहत होतो. मला आनंद व्यक्त करण्याचं कोणतंही कारण नाही. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. मला आता थोडेसे दिलासादायक वाटू लागले आहे, यानंतर सतिश यांनी न्यायाधीशांचे हात जोडून आभार मानले.
