AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाप्रमाणे ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याचा केंद्राचा निर्णय?,चालकांचे काय म्हणणे ?

राज्यात अपघाताचे प्रमाण मोठे आहे. यात ग्रामीण भागात ट्रॅक्टर वाहतूकीचे प्रमाण मोठे असल्याने या ट्रॅक्टरला विमानाच्या धर्तीवर ब्लॅक बॉक्स लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जर ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवला तर अपघाताची सत्यता समोरील अस मत ट्रॅक्टर चालक मालक यांनी त्यांनी व्यक्त केल आहे.

विमानाप्रमाणे ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याचा केंद्राचा निर्णय?,चालकांचे काय म्हणणे ?
ट्रॅक्टरमध्ये ब्लॅक बॉक्स
| Updated on: Aug 12, 2025 | 4:17 PM
Share

विमानाचा अपघात झाला तर त्याच वैमानिकाची चुकी होती का ? किंवा विमानात काही गडबड होती हे शोधून काढण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स महत्वाचा असतो. आता विमानाच्या धर्तीवर धर्तीवर ट्रॅक्टर ट्राल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉस बसवण्याचा विचाराधीन केंद्र सरकार आहे. या निर्णयावर काही जिल्ह्यात विरोध होत असला तरी नांदेडमध्ये मात्र ट्रॅक्टर चालकांनी याचं स्वागत केले आहे. काय आहे या निर्णयावर चालकांचे मत पाहूयात.

विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्राल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉस बसवण्याचा निर्णय केंद्राच्या विचाराधीन आहे. या निर्णयावर काही जिल्ह्यात विरोध होत आहे. मात्र नांदेडमध्ये मात्र ट्रॅक्टर चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.अनेकवेळा अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाला दोषी ठरवले जाते. ट्रॅक्टर चालकांकडून अनेक वेळा क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केली जाते. ऊसाचे ओव्हरलोड ट्रक घेऊन वाहतूक करतानाही अपघात होतात. त्यामुळे ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवला तर अपघाताची सत्यता समोरील अस मत ट्रॅक्टर चालक आणि मालक यांनी त्यांनी व्यक्त केल आहे.

अपघाताचे प्रमाण कमी होईल

मी तीस वर्षापासून ड्रायव्हरचं काम करतो.ट्रॅक्टरचे अपघात होतात मात्र नेमका कशामुळे अपघात होतो हे कळत नाही.ब्लॅक बॉक्स बसवल्यानंतर अपघाताचे नेमकं कारण समजेल. ऊसाला ट्रॅक्टर असल्यावर ओव्हरलोड असतं. ऊस वाहतुकीचे अपघात जास्त होतात. यामध्ये ड्रायव्हरचा सुद्धा मृत्यू होतो. ब्लॅक बॉक्स असला तर ड्रायव्ह सावध होतील, प्रमाण कमी होईल आणि अपघात झाला तर कारणही समजेल असे ट्रॅक्टर चालक साबेर जावेद खान यांनी म्हटले आहे.

कोणावर अत्याचार होऊ नये

आपण ट्रॅक्टर चालताना एखादी व्यक्ती दारू पिऊ शकतो किंवा दारू प्यायलेला असू शकतो. कोणाची चूक आहे हे त्यामधून कळायला पाहिजे कोणावर अत्याचार होऊ नये. ब्लॅक बॉक्स बसवला तर आपली काही माहिती येऊ शकते. ट्रॅक्टरमध्ये 20 ते 22 टन लोड असतो, आठ टायर असतात.ट्रॅक्टर ताबडतोब कधी थांबत नाही, ट्रॅक्टरच्या फक्त दोन टायरला ब्रेक असतात असे ट्रॅक्टर चालक-मालक गोविंद कंदारे यांनी म्हटले आहे.

तरीही ड्रायव्हरला दोष दिला जात असतो

ट्र्रक्टरला ब्लॅक बॉक्स बसवणार ही चांगली बाब आहे. ट्रॅक्टरचा अपघात कशामुळे झाला हे समजेल.अनेकदा अपघात झाला की थेट ड्रायव्हरला दोष दिला जातो. अनेकदा टायर फुटतात, ब्रेक नादुरुस्त असतात तरीही ड्रायव्हरला दोष दिला जात असतो. मी 30 वर्षापासून ट्रॅक्टर चालवतो आहे ब्लॅक बॉक्स ही यंत्रणा उपयोगाची असल्याचे शेषराव वाघमारे यांनी म्हटले आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.