दिवा – मुंब्रा लोकल अपघाताची माहीती द्या, मध्य रेल्वेचे नागरिकांना आवाहन
मुंब्रा येथील लोकल अपघात घटनेती तपशील आणि माहिती देऊन रेल्वे प्रशासनाला मदत करण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली आहे,त्यामुळे या घटनांची अनुक्रमणिका निश्चित करता येईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवार दि.९ जून २०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजता दोन उपनगरीय लोकल जवळून जात असताना प्रवासी ८ प्रवासी पडून त्याच ४ प्रवाशांच्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता या चार प्रवाशांचा जीव गेल्यानंतर आणि अनेक प्रवासी जखमी झाल्यानंतर या घटनेची माहीती देण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली असून त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
दिवा आणि मुंब्रा दरम्यान कसारा लोकल आणि कल्याण लोकल एकमेकांजवळुन वळणावरुन जात असताना आठ प्रवाशी रुळांवर पडले. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात चौकशी सरु असल्याने या घटनेची ज्यांना माहीती आहे त्यांनी त्यांच्याजवळील माहीती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना द्यावी असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चार जणांचा मृत्यू
09 जून 2025 रोजी सकाळी सुमारे 09.01 वाजता दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान मार्ग क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान उपनगरी लोकलगाडीतून फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्या सुमारे आठ प्रवाशांचा तोल जाऊन ते लोकलमधून खाली ट्रॅकवर पडले. यात जीआरपी शिपाई विकी बाबासाहेब मुखदल ( ३४ ) राहुल सुभाष गुप्ता ( २७ ), केतन दिलीपकुमार सरोज ( २३ ) ,मयुर प्रवीण कुमार शहा ( ४३ ) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे.
मध्य रेल्वेचे आवाहन
मध्य रेल्वेने आता नागरिकांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे की जर त्यांच्याकडे या घटनेविषयी किंवा त्यासंदर्भात कोणतीही माहिती, ज्ञान, तपशील असतील तर कृपया ते त्यांनी चौकशी समितीसमोर लवकरात लवकर उपस्थित राहून द्यावेत किंवा खालील दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर, मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर तीन दिवसांच्या आत कार्यालयीन दिवसात पाठवावेत असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
माहितीसोबत ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
एस.एस.सोनवणे
वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय, मुंबई विभाग, मध्य रेल्वे, अॅनेक्स इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मोबाईल क्रमांक: 8828119730 ईमेल: srdsobbcr@gmail.com