Chandrakant Patil : एखाद्याला उत्तर देण्याचे अधिकार आमच्या नेत्यांना, राणेंनी पवारांना दिलेल्या धमकीवर चंद्रकांत पाटलांची भूमिका

आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यावर नारायण राणे काय म्हणाले, ते पाहावे लागणार आहे. मात्र उत्तर, प्रतिक्रिया देण्याचा त्यांना अधिकार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil : एखाद्याला उत्तर देण्याचे अधिकार आमच्या नेत्यांना, राणेंनी पवारांना दिलेल्या धमकीवर चंद्रकांत पाटलांची भूमिका
संजय राऊत, शरद पवार यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:48 AM

कोल्हापूर : कोणाला काय उत्तर द्यायचे, याचे अधिकार आमच्या नेत्यांना आहेत. नारायण राणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी काय म्हणाले, ते पाहावे लागेल. मात्र आपले मत व्यक्त करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. एकूणच नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे चंद्रकांत पाटील यांनी समर्थनच केले आहे. शरद पवार आणि नारायण राणे (Narayan Rane) काय म्हणाले, मला माहीत नाही. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या शक्यता यावरून राजकारण तापले आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलत होते.

‘उत्तर देण्याचे अधिकार’

आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यावर नारायण राणे काय म्हणाले, ते पाहावे लागणार आहे. मात्र उत्तर, प्रतिक्रिया देण्याचा त्यांना अधिकार आहे, असे ते म्हणाले. तर राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ आहे. या घटनांचा भाजपाशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ज्या काही घडामोडी आहेत, त्या टीव्हीवरच पाहायला मिळत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते नारायण राणे?

शिवसेनेचे जे बंडखोर आमदार आहेत, त्यांना मुंबईत येऊ द्या. त्यातील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही बहुमत सिद्ध करणार, असा दावा काल शरद पवार यांनी केला होता. आमदारांना मुंबईत यावेच लागेल, असे विधान पवार यांनी केले होते. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.