राऊतांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे का नव्हते? शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदावर चंद्रकांत पाटलांचं बोट

काल राऊतांच्या पत्रकार परिषदेला कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येने जमले असले तरी शिवसेना आमदार किंवा सरकारमधील नेते का उपस्थित नव्हते असा खोचक सवाल भाजपकडून करण्यात येतोय. आता तर चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेत शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं आहे.

राऊतांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे का नव्हते? शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदावर चंद्रकांत पाटलांचं बोट
राऊतांबरोबर एकनाथ शिंदे का नव्हते?- चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 3:36 PM

कोल्हापूर : कालच शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ संजय राऊत (Sanjay Raut) यांची बहुचर्चित गाजलेली पत्रकार परिषद पार पडली. राऊतांनी या पत्रकार परिषदेत भाजपवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. अगदी देवेंद्र फडणवीस ते किरीट सोमय्या (Kirit Somayya) सर्वांचा समाचार घेतला. तसेच सुधीर मुनगंटीवारांच्या मुलीचं लग्नही उकरून काढलं. या सगळ्याला कालपासूनच भाजप नेते जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. पत्रकार परिषद संपल्यानंतर काहीच वेळात किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनी पुन्हा पलटवार सुरू केला. काल राऊतांच्या पत्रकार परिषदेला कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येने जमले असले तरी शिवसेना आमदार किंवा सरकारमधील नेते का उपस्थित नव्हते असा खोचक सवाल भाजपकडून करण्यात येतोय. आता तर चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेत शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं आहे. संजय राऊतांबरोबर एकनाथ शिंदे का नव्हते? असा थेट सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

संजय राऊत यांना टोला लगावताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राऊत बोलतात मोहीत कंबोज फडणवीसांना घेऊन डुबणार पण त्याची काळजी तुम्ही करू नका. संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार. अडीच वर्षापूर्वी संजय राऊत यांनीच हुलीवर घातलं. पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे संजय राऊत शिवसेनेची वाट लावणार आहेत. शिवसेनेला खड्यात घालणार आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. तर शिवसेनेला त्यांचे नेते गोळा होत नव्हते, मोठ्या मुश्किलीने माणसं जमवावी लागली अशी टीका सतत भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. संजय राऊतांवर सतत एकटे पडले आहेत, असे बोट भाजपकडून दाखवण्यात येत आहे.

प्रकरणात नवं ट्विस्ट

संजय राऊत आणि किरीट सोमय्यांच्या आरोप प्रत्यारोप प्रकरणात आता नवं ट्विस्ट आलं आहे. कारण याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली, त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. आणि 2014 ला ही जमीन मनिषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे. याच बंगल्यांवरून राज्यात सध्या मोठा पॉलिटीकल राडा सुरू आहे. सोमय्या जे बंगले सांगत आहेत ते बंगले अस्तित्वातच नाही, आपण जाऊन पिकनिक काढून पाहून येऊ असे संजय राऊत मंगळवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यानंतर हा बंगल्यांचा वाद पोकसमध्ये आलाय.

19 बंगल्यांचा वाद! कोर्लई गावात मी स्वतः 18 तारखेला जाणार- किरीट सोमय्या

सोमय्या-राऊत वादात कोर्लईच्या सरपंचानं खरं खोटं सांगितलं, त्या 19 बंगल्याचं गौडबंगाल पहिल्यांदाच उघड

बदनापूरचे आमदार नारायण कुचेंच्या भावाची तरुणाला जीवे मारण्याची धमकी? काय आहे प्रकरण?

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.