AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : महापालिकेला मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा विसर, पूरग्रस्तांचे हाल सुरूच; जेवणही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी

मुसळधार पावसामुळे (heavy rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका चंद्रपूर (Chandrapur) शहराला देखील बसला आहे. मात्र दुसरीकडे चंद्रपूर महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे विस्मरण झाल्याचे दिसून येत आहे.

Chandrapur : महापालिकेला मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा विसर, पूरग्रस्तांचे हाल सुरूच; जेवणही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 3:12 PM
Share

चंद्रपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे (heavy rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका चंद्रपूर (Chandrapur) शहराला देखील बसला आहे. मात्र दुसरीकडे चंद्रपूर महानगरपालिकेला (Chandrapur Municipal Corporation) मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे विस्मरण झाल्याचे दिसून येत आहे. पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलविलेल्या नागरिकांची आबळ होत आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसराला झरपट नदीच्या पुराचा फटका बसला. नदीच्या पुराने प्रभावित नागरिकांना महापालिकेच्या प्राथमिक शाळेत हलवण्यात आले आहे. मात्र या शाळेतील सुमारे 115 नागरिकांना अन्न व इतर सुविधा वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दोन दिवस पूरग्रस्तांना खाण्यासाठी केवळ  भात दिल्याने मनपाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. पूरग्रस्त आधीच संकटात सापडले आहे, असे असताना त्यांना जेवण देखील नीट मिळत नसल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा प्रशासनाला विसर

हद्द म्हणजे आज सकाळचा चहा देखील या पूरग्रस्त नागरिकांना मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूरग्रस्त स्वतःच्या पैशाने साहित्य आणून जेवण तयार करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे महापुरात आपले सर्व साहित्य गमावलेल्या पूरग्रस्तांची महापालिकेकडून थट्टा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या नागरिकांना दोन दिवस केवळ भात खाऊन काढावे लागले, तर आज त्यांना सकाळचा चहा देखील मिळाला नसल्याचे समोर आले आहे. या पूरग्रस्तांना महापालिकेने योग्य त्या सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी चंद्रपूरकरांच्या वतीने करण्यात येत आहे.

अनेक गावांचा संपर्क तुटला

दुसरीकडे राज्यात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. गडचिरोली, पालघर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. गेल्या 24 तासांत पवसामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत झालेल्या मृतांचा एकूण आकडा 97 वर पोहोचला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा सपर्क तुटला असून, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.