AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत.या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महत्वाचे विधान केले आहे.

पालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं 'हे' उत्तर
Image Credit source: TV9 Hindi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 11, 2025 | 4:59 PM
Share

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी प्रशासनासह सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. या निवडणुका स्थानिक स्तरावर होत असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. आता या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महत्वाचे विधान केले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले बावनकुळे?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘राज्यातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत. याबाबतचे आदेश आम्ही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकमेकांची याबाबत चर्चा करत आहेत. मात्र जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेवरून वाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र इतर ठिकाणी युतीत निवडणुका लढल्या जातील, त्यामुळे संभ्रम बाळगण्याची गरज नाही.’

आगामी निवडणुका युतीत लढणार – प्रफुल्ल पटेल

आगामी निवडणुकांमधील युतीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहोत, शक्य असेल तिथे युती केली जाईल. मात्र शक्य नसेल तिथे आपण आपल्या ताकदीवर लढू, यासाठी कार्यकर्त्यांना आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे.’

युतीबाबत CM फडणवीस काय म्हणाले?

भाजप महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याच्या बावनकुळेच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. फडणवीस म्हणाले की, ‘आमची भूमिका पक्की आहे, महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत, मात्र एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल.’

निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. अलीकडेच राज्य सरकारने महापालिकांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडूनही या निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यामुळे या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन