AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | छत्रपती संभाजीनगरात BRSची एंट्री, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा पक्ष प्रवेश, रावसाहेब दानवेंना आव्हान?

शिंदेसमर्थित शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यामुळे राजकीयदृष्ट्या तापलेल्या संभाजीनगरात आणखी मोठी घटना घडली आहे. तेलंगणातील बीआरएस पक्षात एका मोठ्या नेत्याने प्रवेश केलाय.

मोठी बातमी | छत्रपती संभाजीनगरात BRSची एंट्री, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा पक्ष प्रवेश, रावसाहेब दानवेंना आव्हान?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 23, 2023 | 8:42 AM
Share

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर संभाजीनगरातली शिवसेनेतली दुही विकोपाला गेली असतानाच आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. छत्रपती संभाजीनगरात आता BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी BRS पक्षात प्रवेश केलाय. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंविरोधात आव्हान उभं केलं होतं. आता हर्षवर्धन जाधव यांचा बीआरएसमधील प्रवेश ही भाजपाची डोकेदुखी ठरू शकते.नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या बीआरएस प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच थेट संभाजीनगरातच हा पक्षप्रवेश झाल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे.

चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात नुकताच प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात केला प्रवेश केल्याचं वृत्त आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात सभा घेणार असल्याचं सूतोवातही हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार अशी चर्चा आहे. जाधव यांच्यामार्फत पक्षाचा विस्तार केला जाऊ शकतो.

रावसाहेब दानवेंसमोर आव्हान

हर्षवर्धन जाधव नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी संजना जाधव या भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजना जाधव गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांतून सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हे आव्हान असल्याचं मानलं जातंय. बीआरएस हा भाजपविरोधी पक्ष आहे. हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे चंद्रशेखर राव यांचं मोठं पाठबळ त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदार संघात रावसाहेब दानवे आणि भाजपसमोर हे मोठं आव्हान ठरू शकतं. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्ष संघटन वाढवण्याच्या उद्देशाने मराठवाड्यात पाय रोवतंय, हे यावरून स्पष्ट होतंय.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद