AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

आज शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहानातून प्रवास केला, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
| Updated on: Jan 03, 2025 | 6:36 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. आज  पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या पाया देखील पडले. त्यानंतर माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा देखील झाली. भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

छगन भुजबळ परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर ही भेट झाली आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर छगन भुजबळ दुसऱ्यांदा पवारांना भेटले, या आधी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर आता  माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली.

दुसरीकडे आज छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली आहे. शरद पवारांना भेटण्यापूर्वी भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. साताऱ्याच्या नायगावमध्ये फडणवीस आणि भुजबळ यांनी एकत्र प्रवास केला. देवेंद्र फडणवीस हे  ड्रायव्हरच्या बाजुला बसले होते तर भुजबळ मागच्या सीटवर बसले होते. भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, त्यातच आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास देखील केला त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान या कार्यक्रमापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला होता.   ‘मी जो काही निर्णय घेतला असेल तो मी तुम्हाला सांगेल का? मी रोज नाराजी नाराजी करून तुमच्यासमोर ओरडत बसू का?  मला काय घाई नाही, मी निर्णय घेतला आहे, माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेल’, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं होतं.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?