AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chagan bhujbal : छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगेंचा माकड म्हणून उल्लेख; हल्लाबोल करताना काय म्हणाले ?

Chagan Bhujbal on Manoj Jarange Patil : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाक् युद्ध थांबताना दिसत नाहीये. ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भुजबळांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज भेट घेतली. त्यावेळी भुजबळ यांनी जरांगेंचा माकड म्हणून उल्लेख करत कडाडून टीका केली.

Chagan bhujbal : छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगेंचा माकड म्हणून उल्लेख; हल्लाबोल करताना काय म्हणाले ?
छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगेंचा माकड म्हणून उल्लेख
| Updated on: Jun 22, 2024 | 4:05 PM
Share

जंग लगी तलवार को अब धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकात भूल गये, अपनी याद उन्हे दिलानी होगी.. आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही. कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही अशा शब्दांत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाडून टीका केली.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत हेत. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे. तर, भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा हा इशारा उडवून लावला. ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भुजबळांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज भेट घेतली. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आज भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर पुन्हा कडाडून हल्ला चढवत त्यांचा माकड असा उल्लेख केला. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही , असे ते म्हणाले. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ला केला होता.

भुजबळ काय म्हणाले ?

कुछ लोग अपनी औकात भूल गये, अपनी याद उन्हे दिलानी होगी… खरे दाखले असतील तर हरकत नाही. पण खोटे असेल तर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते दाखले तपासले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनेक दाखल्यांवर खाडाखोड झाल्याचं भुजबळांनी नमूद केलं. काही लोक ओबीसीत जातात फायदा घेतात. नंतर आर्थिक मागास दाखवतात आणि त्याचं प्रमाणपत्र दाखवून लाभ घेतात. नंतर एसीबीसीचंही आरक्षण घेत आहे. एकच माणूस तीन तीन ठिकाणी आरक्षण मागत आहे. त्याला आधार कार्डची जोड द्या. म्हणजे एका व्यक्तीला एकाच कॅटेगिरीतून आरक्षण मिळेल. ही काही खिरापत नाही. या पंगतीतून उठ, त्या पंगतीत जा. त्या पंगतीतून या पंगतीत या असं चालणार नाही. हे खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

ते आमचं मागतात, आम्ही त्यांचं मागत नाही

आमची मागणी होती. आम्हाला समाजाची मागणी आहे त्यांना जे मिळालं ते आम्हाला द्या. सारथी सारख्या सुविधा द्या. आमच्या मंत्र्यांचीही उपसमिती नेमा. ती मागणीही मान्य केली आहे. ते तर आमचं मागतात. आम्ही त्यांचं मागत नाही. त्यांना जसं मिळालं तसं आम्हाला द्या. सगेसोयरे. सगे म्हणजे आपले सख्खे ते. सोयरे म्हणजे बायकोच्या बाजूचे. त्यांचं म्हणणं सोयऱ्यांना घ्या. वडिलांचे वडील. त्याचे वडील. म्हणजे त्याने दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतरही त्याला द्या. हे चालणार नाही. कुणबीचे जे नियम आहे. कोर्टाने जे नियम घालून दिले आहे. ते त्यांना दिलं पाहिजे. आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना अधिवेशन काळात एकत्र बोलावणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. हाके आणि नवनाथ वाघमारे यांना बोलावणार आणि सर्वांच्या समोर आम्ही पुरावे मांडणार.

सगेसोयरे कोर्टात टिकणारच नाही

काही राजकारणी फार हुशार आहेत. ते इकडे डमरू वाजवतील. तिकडेही वाजवतील. आमच्या एका सहकाऱ्याने सांगितलं सगेसोयरे कोर्टात टिकणारच नाही. गिरीश महाजन यांनी सांगितलं. ओबीसींच्या लढ्यात असे आपले सहकारी हात बळकट करण्यासाठी सज्ज झाले आहे. आता घाबरायचं नाही. मागे राहायचं नाही.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा