AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, सुप्रीम कोर्ट ते आयोग.., नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणार आहे, यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, सुप्रीम कोर्ट ते आयोग.., नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Aug 23, 2025 | 6:06 PM
Share

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. हा मोर्चा पहिल्या मोर्च्यापेक्षा पाच पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

असं आहे की, त्यांचं ठीक आहे, त्यांची  मागणी होती,  मराठा समाजाला आरक्षण द्या, ते दिल्या गेले आहे. मराठा समाजाला दहा टक्क आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण आम्ही टिकवणार असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खरं म्हणजे तो प्रश्न संपलेला आहे. मग कशासाठी हा आग्रह? हे कळण्याच्या पलिकडचं आहे, असा हल्लाबोल भुजबळ यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बाकीच्या काही गोष्टी आहे त्यावर आपण विचार केला पाहिजे. सारथी, बार्टी, महाज्योती या सारख्या संस्था आहेत. ज्या गोष्टी सारथीच्या माध्यमातून मिळतात त्यातील अनेक गोष्टी महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या नाहीते. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, ओबीसीची संख्या मोठी आहे, त्यांना किमान समान वागणूक द्या. विद्यार्थ्यांना हे कळत नाही की पैसे कोण देतं?  आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून पैसे येतात, विद्यार्थ्यांना एवढंच माहिती असतं की सरकार पैसे देतं, मात्र आम्ही या गोष्टी विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत. मग त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, त्याला देतात मग मला का देत नाही, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.

मुख्य सचिवांनी याच्यात लक्ष देऊन सर्वांना समान वागणूक कशी मिळेल ते बघावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. चांगलं काम चाललेलं आहे. मराठी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत.  पावसामध्ये, गणपती उत्सवामध्ये हे काय करणार आहे? मला काही कळत नाही. लोकांना  का त्रास देतायेत? त्यांचं जर हेच म्हणणं असेल की ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, तर चार आयोगांनी आरक्षण नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टानेही फार मोठा जजमेंट दिलेलं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं  आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?