AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khawadya Dongar Case Update: उरलं फक्त भयाण घर, आणि सतत भुंकणारा कुत्रा…

Sheru Chandgude Family Dog: छत्रपती संभाजीनगर येथे 21 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेमुळे देशभरात एकच थरकाप उडाला आहे. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा एकाचवेळी मृत्यू झाला. कुणाल मुरलीधर चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. हे तिघे जरी एकाच वेळी जग सोडून निघून गेले असले तरीही मात्र त्यांच्या घरातला लाडका शेरू नावाचा पाळीव कुत्रा आजही त्याच घरात आहे.

Khawadya Dongar Case Update: उरलं फक्त भयाण घर, आणि सतत भुंकणारा कुत्रा...
| Updated on: Aug 23, 2026 | 1:07 PM
Share
Kunal Chandgude Khawadya Dongar Case: छत्रपती संभाजीनगर येथे 21 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेमुळे देशभरात एकच थरकाप उडाला आहे. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा एकाचवेळी मृत्यू झाला. कुणाल मुरलीधर चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. हे तिघे जरी एकाच वेळी जग सोडून निघून गेले असले तरीही मात्र त्यांच्या घरातला लाडका शेरू नावाचा पाळीव कुत्रा आजही त्याच घरात आहे. कालपर्यंत जो कुत्रा या कुटुंबासोबत वावरत होता आता तोच कुत्रा पोरका झाला आहे.
आपल्या माणसांच्या आवाजाची, त्यांच्या सहवासाची त्याला सवय होती. अचानक सगळेच निघून गेल्याने शेरू अस्वस्थ झाला आहे. तो सतत भुंकत आहे, खिडकीतून त्याला पाणी आणि खाणं देऊन शेजारी त्याची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेरू हा चांदगुडे कुटुंबासाठी केवळ पाळीव कुत्रा नव्हता, तर घरातील एक सदस्य होता. कुणाल आणि त्याची आई संगीता यांच्यासोबत शेरू जवळपास संपूर्ण दिवस घालवत असे. कुणाल दररोज सकाळी शेरूला फिरायला घेऊन जायचा, त्याच्यासोबत तो अतिरिक्त वेळ घालवायचा. तो कुणालच्या अगदी जवळचा मित्र होता.
कुटुंबातील तिघांच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर शेजाऱ्यांनी कुत्र्याची काळजी घेण्यासाठी चांदगुडे कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली. मात्र, घराला कुलूप असल्याने शेरूला बाहेर काढणं शक्य नव्हतं, घरात अडकलेल्या शेरूला शांत करण्यासाठी शेजाऱ्यांनी खिडकीतून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याला बिस्कीट आणि पाणीही दिले. मात्र, शेरू सतत भुंकत आहे असे शेजाऱ्यांनी सांगितले. आता या शेरूची जबाबदारी संगीता यांचे वडिल घेणार आहेत.
संपूर्ण कुटुंबांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता शेरू सध्या घरात एकटाच आहे. त्याला घरातून बाहेर काढायचे आहे मात्र, घराचे कुलूप स्वतःहून उघडल्यास पुढे अनेक अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून घर उघडावे आणि शेरूची तातडीने सुटका करावी, अशी मागणी शेजाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...