AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन आहे की नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल- डिझेलचा साठा किती? आकडेवारी आली समोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनाची तीव्र टंचाई जाणवत आहे, जिथे अधिकृत आकडेवारी मोठ्या साठ्याची नोंद करते, तर प्रत्यक्षात अनेक पंपांवर पेट्रोल-डिझेल उपलब्ध नाही. नागरिक आणि शेतकरी यामुळे त्रस्त असून, पेरणीसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.

इंधन आहे की नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल- डिझेलचा साठा किती? आकडेवारी आली समोर
पेट्रोल- डिझेलचा साठा किती?
| Updated on: May 23, 2026 | 3:06 PM
Share

राज्यात इंधनाची तीव्र टंचाई सुरू आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नो पेट्रोल डिझेलचे बोर्डही लागले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचेच हाल होत आहेत. छत्रपती संभीजनगरमध्येही यापेक्षा वेगळं चित्र नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संदर्भातील 22 मे 2026 चा स्टॉक रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालानुसार शहरात पेट्रोलचा एकूण साठा 21 लाख 78 हजार लिटर होता. त्यापैकी 6 लाख 61 हजार लिटर पेट्रोलची विक्री झाली असून सध्या 15 लाख 17 हजार लिटर पेट्रोल शिल्लक आहे. तर 7 लाख 65 हजार लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये असल्याची माहिती आहे.

पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या साठ्याची माहितीही समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेलचा एकूण साठा 25 लाख 80 हजार लिटर होता. त्यापैकी 12 लाख 72 हजार लिटर डिझेलची विक्री झाली आहे. जिल्ह्यात सध्या 13 लाख 8 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून 12 लाख 55 हजार लिटर डिझेल ट्रान्झिटमध्ये आहे. दरम्यान, काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत असल्या तरी शहरात मोठ्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्यामुळे पंप बंद असल्याचे सुद्धा दुसरीकडे पाहायला मिळत आहे.

कुठे आहे साठा ?

जिल्ह्यात 13 लाख 8 हजार लिटर डिझेल उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. अनेक पेट्रोल पंप फिरलो तरी डिझेल मिळत नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. डिझेलचा साठा उपलब्ध आहे तर आम्हाला का मिळत नाही? असा सवाल करत शेतकऱ्याने डिझेल उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा खोडून काढला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर येथे डिझेल नेण्यासाठी कॅन घेऊन शेतकरी पेट्रोल पंपावर दाखल झाले आहेत. पेरणी तोंडावर आली असताना शेतीसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ सांगतात डिझेल उपलब्ध आहे, कुठे आहे? त्यांनी सांगावं, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे, सरकारने शेती कामासाठी डिझेल उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

साधं पेट्रोल डिझेल तर द्या

एमआयएमचे नगरसेवक कुणाल राऊत यांनाही काल डिझेल टंचाईचा फटका बसला. डिझेल भरण्यासाठी राऊत यांचे चालक दोन तास रांगेत उभे होते. दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर त्यांना डिझेल मिळाले. माझे ड्रायव्हर जवळपास दोन तासापासून या रांगेत उभे होते. पंतप्रधानांचे फ्लाईट विदेशात फिरत आहेत. महाराष्ट्रातील गोरगरीब जनता एक एक किलोमीटरपर्यंत रांगेत आहे.मोदींना माझं म्हणणं आहे की तुम्ही विदेशात फिरा. मात्र लोकांना जे प्रॉब्लेम होतात त्यांच्याकडे लक्ष द्या. महागाई वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत. दोन दोन तीन तासापासून लोक रांगेत उभे आहेत. याला जबाबदार कोण आहे? मोदी साहेब तुम्ही मेलोडी वाटत आहेत. आमच्या लोकांना साधं चॉकलेट तर द्या, पेट्रोल डिझेल तर द्या, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ