Khavdya Dongar : ज्या मुलामुळे खवड्या डोंगरावरुन आई-वडिलांचा जीव गेला, त्या कुणालचे दहावीतले मार्क्स ऐकून थक्क व्हाल, प्रचंड हुशार होता मुलगा

Khavdya Dongar : जीवन संपवण्यावर अडून बसलेल्या कुणालला ग्रामस्थ समजावण्याचा प्रयत्न करत होते. फायर ब्रिगेडचे लोक तिथे होते. पण डोंगराच्या कड्यावर उभा असलेला कुणाल कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

Khavdya Dongar : ज्या मुलामुळे खवड्या डोंगरावरुन आई-वडिलांचा जीव गेला, त्या कुणालचे दहावीतले मार्क्स ऐकून थक्क व्हाल, प्रचंड हुशार होता मुलगा
Khavdya Dongar
| Updated on: Aug 22, 2026 | 2:25 PM

महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेची चर्चा आहे. हे प्रकरण समजल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतोय. कारण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळं कुटुंब उद्धवस्त झालं. आयफोनच्या छोट्याशा वादातून आई-वडिल आणि मुलगा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. खरंतर खवड्या डोंगरावरचा घटनाक्रम खूप धक्कादायक आहे. आई-वडिल तब्बल तीन तास कुणाल चांदगुडेची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. वडील खर्चाला पैसे देत नाहीत आणि मोबाइलचे हप्ते थकल्याचा राग कुणालच्या मनात होता. त्यातून हे सर्व घडलं. शुक्रवारी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

कुणाल अभ्यासात हुशार होता. डॉक्टर बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. दहाव्या इयत्तेत मिळालेले मार्क्स त्याच्या हुशारीची ग्वाही देतात. कुणाला दहावीच्या परीक्षेत तब्बल 92 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे तो प्रतिभावान, हुशार मुलगा होता, हे त्याच्या गुणांमधून दिसतं. पण आयफोनच्या हट्टापायी अख्ख कुटुंब संपलं. ‘आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं”, असं कुणाल शेवटी म्हणाला.

तिला अजिबात सहन झालं नाही

जीवन संपवण्यावर अडून बसलेल्या कुणाला ग्रामस्थ समजावण्याचा प्रयत्न करत होते. फायर ब्रिगेडचे लोक तिथे होते. पण कुणाल कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. डोंगराच्या कड्यावर असलेल्या कुणालचं मन वळवण्याचं वडिल प्रयत्न करत होते. त्याला मागे आणण्याच्या प्रयत्नात दोघेही कड्यावरुन खाली कोसळले. जवळच आई होती. तिने हे सर्व पाहिलं. तिला अजिबात सहन झालं नाही. तिने सुद्धा जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिने देखील उडी मारली. क्षणात कुटुंब संपलं.

तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी..

अखेरच्या क्षणी त्या कुटुंबात काय संवाद झाला ती माहिती सुद्धा समोर आली आहे. “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस” या शब्दात आईने कुणालची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तो नाही ऐकला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us