AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते, पण..’ खवड्या डोंगरावर मृत्यूआधी जो संवाद घडला त्याची माहिती समोर

Khavdya Dongar : अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली होती. मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता. डोंगराच्या कड्यावर कुणाला रोखण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघे डोंगरावरुन खाली कोसळले.

Khavdya Dongar : 'तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते, पण..' खवड्या डोंगरावर मृत्यूआधी जो संवाद घडला त्याची माहिती समोर
khavdya dongar
| Updated on: Aug 22, 2026 | 12:05 PM
Share

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक मन सून्न करणारी घटना घडली. आयफोनच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आई, वडिल आणि मुलगा. एकाक्षणात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. सगळ्या देशभरात या घटनेची चर्चा आहे. आयफोनचे हप्ते थकले होते. त्यावरुन कुटुंबात वाद झाला होता. वडील खर्चाला पैसे देत नाहीत आणि मोबाइलचे हप्ते थकल्याची सल कुणाल चांदगुडेच्या मनात होती. त्यावरुन घरात त्याचा वाद झालेला. कुणाल रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाला हा कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. कुणाल डोंगरावर पोहोचल्यानंतर आई-वडिलांनी तिथे तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो डोंगरावरच्या अत्यंत उंच असलेल्या भागावर उभा होता.

अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली होती. मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता. डोंगराच्या कड्यावर कुणाला रोखण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघे डोंगरावरुन खाली कोसळले. आई तिथेच उभी होती. तिने हे सर्व पाहिलं. आईला हा धक्का सहन झाला नाही. तिने देखील उडी मारली. क्षणात कुटुंब संपलं.

तुझ्यासोबत येते, दोघे राहू

ही घटना घडली, त्याआधी तिथे काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस” आत्महत्या करणाऱ्या मुलाकडे व्याकुळ आई अशी आर्त हाक देत त्याला कठड्यावरून अलीकडे येण्यासाठी विनवत होती. वडिलांसोबतच्या मतभेदातून स्वप्नच अपूर्ण राहत असल्याचा गैरसमज करुन घेतलेल्या कुणालने टोकाचं पाऊल उचललं.

माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही

शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने मुलांची बदलणारी मानसिकता आणि संपत चाललेल्या सहनशीलतेचा गंभीर मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला. मूळ अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील असलेले चांदगुडे कुटुंब 18 वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुणालने नुकताच अकरावीत प्रवेश घेतला होता. दहावीच्या परीक्षेत त्याने 92 टक्के गुण मिळवले होते. काही दिवसांपासून वडिलांसोबत त्याचे वाद होत होते. वडील खर्चाला पैसे देत नसल्याची आणि मोबाइलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात होती. कुणालने त्याच्याकडील आयफोन, हातातील घड्याळ, गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकली होती. ‘आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं”, असं कुणाल म्हणत होता. शेवटी अखंखी कुटुंब घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं.

Follow Us
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?