Ishan Kishan: बॉल दिसलाही नाही तरीही ‘अंदाजपंची’ कॅच पकडला, इशान किशन स्वत:ही शॉक, Video Viral
Ishan Kishan Catch Video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना रंगला. हा सामना भारतीय संघाने जिंकला. पण या सामन्यातील कॅचची जास्त चर्चा सुरु आहे.

Ishan Kishan Video: इशान किशनने मैदानावर असा झेल घेतला की केवळ फलंदाजच नाही, तर गोलंदाज कुलदीप यादवलाही आश्चर्याचा धक्का बसला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात, मॅथ्यू फोर्डने कुलदीपच्या एका आखूड चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही. तेव्हा इशान किशनने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौशल्याचे प्रदर्शन करत, जो कॅच पकडला तो खरोखरंच अविश्वसनीय होता.
कुलदीप यादवने फोर्डला एक आखूड चेंडू टाकला. फलंदाजाला चेंडूचा योग्य टायमिंग साधता आला नाही. मिडविकेटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या इशान किशनच्या डावीकडे चेंडू होता. चेंडू पकडण्यासाठी इशान वेगाने धावला. एका क्षणी, त्याला चेंडू नीट दिसत नसल्याचे दिसले. फ्लडलाइट्समुळे त्याचे लक्ष चेंडूवरून विचलित झाले. असे असूनही, त्याने स्वतःवर नियंत्रण मिळवले. सुरुवातीला असे वाटले की इशान किशन चेंडू पकडू शकणार नाही. मात्र, त्याने अंदाज बांधून आपला हात पुढे सरकवला. चेंडू थेट त्याच्या डाव्या हातात आला. झेल पूर्ण झाल्यावर, आपण तो झेल कसा घेतला या विचाराने इशान स्वतः काही क्षण आश्चर्यचकित दिसला. फोर्डने ४ चेंडूंचा सामना केला आणि केवळ २ धावा केल्या.
Reflexes and awareness 👌 Reaction 👉 😮 😅
What a grab by Ishan Kishan!
Updates ▶️ https://t.co/2czVyKWreK
#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ishankishan51 https://t.co/PaAI9sUD1p
— BCCI (@BCCI) October 6, 2026
एकाना स्टेडियमवर वेस्ट इंडिजने भारतीय संघाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने शेर्फेन रदरफोर्डसोबत अर्धशतके झळकावली. यामुळे संघाने १७१ धावा केल्या. भारतासाठी पदार्पण करणाऱ्या नमन धीरने सर्वाधिक तीन बळी घेतले. कुलदीप आणि अक्षरने प्रत्येकी २ बळी मिळवले.
फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने शतकी खेळी खेळली. ४३ चेंडूंत श्रेयसने शतकी खेळी खेळली. इशान किशनला ३७ धावा करता आल्या. संजू सॅमसनने ११ धावा केल्या तर अभिषेक शर्माने २१ धावा केल्या. भारतीय संघ सहज सामना जिंकला. आता आणखी ४ सामने खेळायचे आहेत. पाच सामन्यांची मालिका आहे.
