AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar : अरे आईसाठी तर जग ना… खवड्या डोंगरावर सरपंचांनीही काढली होती कुणालची समजूत, पण…

खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका कौटुंबिक वादामुळे कुणालने डोंगरावरून उडी मारली. त्याला वाचवताना वडील कोसळले आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हे पाहून शोकाकुल आईनेही जीवन संपवले. क्षणार्धात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं, मागे फक्त शोकाकुल वातावरण राहिले.

Khavdya Dongar : अरे आईसाठी तर जग ना... खवड्या डोंगरावर सरपंचांनीही काढली होती कुणालची समजूत, पण...
खवड्या डोंगरावरून पडून तिघांचा गेला जीव
| Updated on: Aug 22, 2026 | 10:03 PM
Share

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर (Khavdya Dongar) जे घडलं त्याने अख्खं राज्य सुन्न झालं आहे. एका शुल्लक गोष्टीमुळे तीन जीव गेले, हसतं-खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं आणि मागे राहिला तो फक्त विलाप. शुक्रवारी दुपारी कुणालने चांदगुडे या 19 वर्षांच्या मुलाचा या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याला वाचवायला गेलेले वडीलही त्याच्यासोबत खाली कोसळले आणि त्यांचाही जीव गेला. आपल्या डोळ्यांदेखतच पती आणि पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं पाहून, कुणालच्या आईला दु:ख अनावर झालं आणि त्यांनीही डोंगवारून खाली उडी मारून आपलं आयुष्य संपवंल. डोळ्याच पात लवतं ना लवतं तोच अवघ्या काही क्षणात घडलेल्या या अतिशय दुर्दैवी घटनेत तिघांनी जीव गमावलाच. मात्र या भयानक दृश्याने गावकरी शोकाकुल आहेत, हळहळ व्यक्त होत्य पण या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी तिघांच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवले.

आई-वडिलांशी वाजलं आणि त्याने थेट डोंगरच गाठला

कुणाल मुरलीधर चांदगुडे ,मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे अशी तिघा मृतांची नाव असून ते सर्वजण देवळाई सातारा परिसर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेच्या आधी कुणालचं ( वय 19) त्याच्या आई-वडिलांशी जोरदार भांडण झालं होतं, त्यानंतर रागाच्या भरातच तो सकाळी 10 च्या सुमारा खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्यापाठोपाठ त्याचे आई-बाबाही तिथे पोहोचले आणि मुलाची समजूत काढत त्याला घरी येण्यास सांगू लागले. या भांडणाची, वादाची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली आणि काही ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली, त्यापाठोपाठ पोलिस, बचावपथकाचे अधिकारी आणि गावचे सरंपचंही त्या डोंगरावर दाखल झाले. सुमारे तीन तास खवड्या डोंगरावर हे नाट्य सुरू होतं, अनेक जण कुणालशी बोलून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

जे पाहिजे ते देतो .. अरे आईसाठी तरी जग ना.. सरपंचांनीही काढली होती समजूत

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या हट्टावर कायम असलेल्या कुणालची गावच्या सरपंचांनीही खूप समजूत काढली, ते त्याला समजावत होते, त्यांनी त्याला विविध वचनंही दिली. ‘ मी गावचा सरपंच आहे ना. तुला जे पाहिजे ते घेऊन देतो रे. तू आधी गावात चल, घरी चल ‘ असं त्यांनी म्हटलं. मात्र त्यांच बोलणं ऐकूनही कुणाल काहीच ऐकायला तयार नव्हता, ते पाहून अखेर सरपंचांनी त्याला भावनिक साद घातली. ‘अरे उडी मारून तुला काय मिळणारे ? तुझ्या आईसाठी तरी जग ना रे !’ असं म्हणत त्यांनी त्याला उडी न मारण्याचा आवाहन केलं. मात्र कुणाल कोणाचचं ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. ‘मला मरायचंय, हा एकच पर्याय आहे’ असं तो म्हणत होता, अशी माहिती काहींनी दिली.

कसं वाचवावं, रेस्क्यू टीमलाही कळेना

या घटनेची माहिती मिलताच बचाव पथकाच्या अधिकाऱ्यानी तिथे धाव घेतली होती, काहींनी डोंगराच्या खाली जाळीही लावण्याचा प्रयत्न केला. मात्र 19 वर्षांचा कुणाल वारंवार त्याची जाग बदलत होता, त्यामुळे तो नक्की कुठून उडी मारू शकतो, याचा अंदाज लावणंही बचावकर्मींसाठी अतिशय कठीण होतं.

वाळूज एमएआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 च्या सुमारास कुणालचे वडील हळूहळू त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याची समजूत काझू लागले, त्यांना त्याला मागे यायला सांगितलं. मातर् तेवढ्यात कुणालने अचानक खाली उडी मारली, त्याला पकडन वाचवायच्या नादात त्याचे वडीलही डोंगरावरून खाली कोसळले. ते दोघेही डोंगराच्या दरीत खाली पडताच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहून शोक अनावर झालेल्या मुलाच्या आईनेही डोंगरावरुन खाली उडी मारली. त्यामुळे तिचाही मृत्यू झाला.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?