AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने…विधिमंडळातील सत्कारानंतर सरन्यायाधीश काय म्हणाले?

भारताचे सरन्यायाधीस भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते.

बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने...विधिमंडळातील सत्कारानंतर सरन्यायाधीश काय म्हणाले?
bhushan gavai
| Updated on: Jul 08, 2025 | 3:50 PM
Share

भारताचे सरन्यायाधीस भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या उपस्थितीत गवई यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी माझ्यासाठी हा सत्कार फार महत्त्वाचा आहे. कारण याच विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधत्त्व केलेलं आहे. त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी फार भूषणवाह बाब आहे, असे गवई म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय संविधानाबाबत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे भारतीय संविधानविषयक विचार यावर मत व्यक्त केले. संविधान तयार करताना आंबेडकरांचे विचार काय होते? याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

बाबासाहेबांना ऐनवेळी बोलायला सांगितलं, नंतर…

मी भारतीय राज्यघटनेचा विद्यार्थी आहे. या विधिमंडळाशी माझ्या वडिलांचं ३० वर्षापेक्षा अधिक प्रेमाचं नातं राहिलं आहे. त्या विधिमंडळात माझा सन्मान करत आहात हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ९ डिसेंबर १९४६ रोजी भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली. १३ डिसेंबर १९४६ रोजी नेहरूंनी घटना समितीचं स्वरुप आणि स्कोप काय राहिल असं सांगितलं. १३ डिसेंबर रोजी बाबासाहेबांना बोलायला सांगितलं. त्यांना वाटलं होतं दोन ते तीन दिवसाने क्रम येईल असं वाटलं होतं असं बाबासाहेब म्हणाले. पण त्यांना ऐनवेळी बोलण्यास सांगितलं. मसुदा समितीचे अध्यक्ष होऊ असं त्यांना वाटलं नाही, असे गवई म्हणाले.

मूलभूत अधिकाराचं हनन झालं असेल तर…

तसेच, या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनमध्ये अनेक गोष्टी आहेत. यात राईट टू लाइफ, राईट टू लिबर्टी आहे, राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी या मूलभूत गोष्टीत त्यात नाही. आपण त्यात काही फंडामेटल अधिकार दिले. पण राईट्स नाही दिले. जोपर्यंत मूलभूत अधिकाराचं हनन झालं असेल तर त्यावर रेमिडी देणार नसू तर अधिकाराला काही अधिकार नाही, असं बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याचं गवई म्हणाले.

बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने…

तसेच, मला नेहरूंकडून अधिक अपेक्षा होत्या असं आंबेडकर म्हणाले होते. या घटनेत देशात सामाजिक आर्थिक एकता कशी यावी यासाठीची त्यात तरतूद नाही, असं बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. मी प्रथम आणि शेवटचा भारतीय आहे, असं बाबासाहेब म्हणाले होते, अशी आठवण गवई यांनी सांगितली.

बाबासाहेबांनी त्यावेळी आपल्या भाषणात अनेक इशारा दिले आहेत. बाबासाहेब म्हणाले की मोठ्या मुश्किलीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे. हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर जातीभेद दूर करून त्यावर कारवाई करण्याची राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय या घटनेद्वारे देण्याचं वचन दिलं आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही काय आहे? तर सामाजिक आणि राजकीय लोकशाही हे स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व आहे. हा जगण्याचा मार्ग आहे. आपण ती मिळवली पाहिजे असं बाबासाहेब म्हणल्याचेही सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.

बंधुत्व यासाठी महत्त्वाचं आहे की….

नुसती समानता राहिली तर लोकांना आपल्या आयुष्यात काही हासिल करण्याचं इनिशिएटिव्ह राहणार नाही. केवळ स्वातंत्र्य राहिलं तर दुबळ्यावर त्याचं वर्चस्व राहिली. बंधुत्व यासाठी महत्त्वाचं आहे की इक्विटी आणि लिबर्टिचं संरक्षण असेल, असं बाबासाहेब म्हणाल्याची आठवण गवई यांनी करून दिली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांचा गौरव केला होता. बाबासाहेबांचं आरोग्य चांगलं नसतानाही त्यांनी एकहाती हे मिशन पूर्ण केल्याचं राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, अशी आठवण गवई यांनी सांगितली.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.