ब्रेकिंग न्यूज… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमित शाह यांना पत्र, रोहित पवार यांचा उल्लेख; काय केली मागणी?

रोहित पवार यांच्या आरोपांनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना पाठवलेलं पत्र समोर आलं आहे, ज्यामध्ये रोहित पवार यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

ब्रेकिंग न्यूज... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमित शाह यांना पत्र, रोहित पवार यांचा उल्लेख; काय केली मागणी?
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Mar 18, 2026 | 4:03 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी निघाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच राज्य सरकारकडून सीबीआय चौकशीसाठी पत्र न गेल्याचा आरोप देखील या संदर्भात रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात 6 मार्च रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात रोहित पवार यांचा देखील उल्लेख आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रासोबतच रोहित पवार यांचं देखील पत्र जोडलं आहे.   अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 6 मार्च रोजीच पत्र पाठवण्यात आलं आहे.

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाला दिलासा 

दरम्यान पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आसावरी जगदाळे यांना वर्ग-2 च्या नोकरीचं पत्र देण्यात आलं आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत नोकरी मिळाली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडून नियुक्तीबाबत विशेष आदेश देण्यात आले आहेत.  आज दुपारी जगदाळे यांना महापौरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.  पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले.  त्यानंतर भारताकडून ऑपरेश सिंदूरची मोहीम हाती घेण्यात आली, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जगदाळे यांना सरकारी नोकरी मिळाली आहे.

 

 

 

Follow Us