Vinayak Mete:अपघात की घातपात? विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरणी CID चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मेटे यांच्या अपघाताची CID चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  माझं लेकरु अपघातानं गेलं नाही,  जाणूनबुजून मारल्याची संशय व्यक्त करत त्याची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी विनायक मेटेंच्या मातोश्रींनी केली होती.

Vinayak Mete:अपघात की घातपात? विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरणी CID चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या तपासाला वेगImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 6:05 PM

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि मराठा समाजातले ही एक महत्त्वाचे नेते विनायक मेटे( Vinayak Mete) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. मात्र, त्यांचा अपघात की घातपात? अशा संशय व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी सीआयडी चौकशीचे(CID inquiry ) आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत. मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मेटे यांच्या अपघाताची CID चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  माझं लेकरु अपघातानं गेलं नाही,  जाणूनबुजून मारल्याची संशय व्यक्त करत त्याची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी विनायक मेटेंच्या मातोश्रींनी केली होती. मेटे यांचा अपघात नसून हा घातपात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले

14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण 150 मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने दोरदार धडक दिली. मेटे यांच्या कारला धडक देऊन या ट्रकने थेट पालघरच्या दिशेने पळ काढला होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या सहाय्याने ट्रकचा नंबर शोधून चालकाला ताब्यात घेतले आहे.

अपघाताची माहिती समजताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विनायक मेटे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. यामुळे अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत असल्याचे एमजीएमचे मेडिकल संचालक डॉ. कुलदीप संकोत्रा यांनी सांगितलं.

सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी मेटे यांच्या कारला अपघात झाला. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी मेटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांचा ईसीजी काढण्यात आला, पण तो पूर्णपणे ब्लँक आला. त्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

रसायनी पोलीस विनायक मेटे यांचे कारचालक एकनाथ कदम यांची चौकशी करत आहेत. विनायक मेटे यांचे ड्रायव्हर एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. या अपघातात कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.