AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Chavan suicide case | पूजाच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी, तो आवाज संजय राठोड यांचाच, चित्रा वाघ आक्रमक

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Pooja Chavan suicide case | पूजाच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी, तो आवाज संजय राठोड यांचाच, चित्रा वाघ आक्रमक
चित्रा वाघ आणि पूजा चव्हाण
| Updated on: Feb 15, 2021 | 3:45 PM
Share

मुंबई :पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे,” असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर पूजाचे वडील लहू चव्हाण (Lahu Chavan) यांनी काल (14 फेब्रुवारी) प्रथमच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्हाला बदनाम करु नका. तिला कर्जाचे टेन्शन आले असावे, असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावर, तसेच पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना चित्रा वाघ यांनी वरील प्रतिक्रिया दिली. त्या मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या. (Chitra Wagh criticizes Mahavika Aghadi said that Sanjay Rathore have to give resignation)

गृहराज्यमंत्री राठोड यांचे संरक्षण करतायत का?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात जी मुलं साक्षीदार होती त्यांना सुरुवातीला सोडण्यात आलं. आता त्यांचा शोध घेतला जातोय,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, गृहराज्यमंत्री संजय राठोड यांचं संरक्षण करतायत का?, असा खोचक सवालही त्यांनी सरकारला केला.

संजय रोठोड यांची गच्छंती व्हायला हवी

यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय राठोड यांचाचा आहे, असा दावा त्यांनी केला. “प्रशासनाला एक मंत्री सापडत नाहीये. संपूर्ण राज्यासाठी हे दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टी खूप संशयास्पद आहेत. संजय राठोड यांची गच्छंती व्हायला हवी. पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला हवा,” असे त्या म्हणाल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स नीट ऐकल्या नसतील तर त्यांनी त्या नीट ऐकायला हव्यात, असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात नियमानुसारच चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आगामी काळात या प्रकरणात काय खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!

(Chitra Wagh criticizes Mahavika Aghadi said that Sanjay Rathore have to give resignation)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.