महिलेच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन टोमणे, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तुफान हाणामारी, 22 जणांना अटक

महिलेच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन टोमणे, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तुफान हाणामारी, 22 जणांना अटक

ग्रामपंचाय निवडणुकीदरम्यान एका महिलेच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन उफाळलेल्या वादाचे रुपांतर चक्क दोन गटाच्या हाणामारीत झाले. (Clashes between two groups in Dhule)

चेतन पाटील

|

Jan 17, 2021 | 6:24 PM

धुळे : ग्रामपंचाय निवडणुकीदरम्यान एका महिलेच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन उफाळलेल्या वादाचे रुपांतर चक्क दोन गटाच्या हाणामारीत झाले. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील लंगाने गावात हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगाने गावात एका महिलेने तिच्या व्हाट्सअ‍ॅप  स्टेटसवर टाकलेल्या माहितीवरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर दोन गटात तुफान हाणामारीत झालं. या हाणामारीत दोन जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे (Clashes between two groups in Dhule).

या घटनेच्या पार्श्वभूमीवर लंगाने गावात सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे गावात पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गावात दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच राजकीय वातावरण तापल्याने गावातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं (Clashes between two groups in Dhule).

यवतमाळमध्ये दोन गटात हाणामारी

याआधी यवतमाळमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीदरम्यान मतदानावरून दोन गटात हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. शेंबाळपिंपरीत उर्दू शाळेच्या मतदान केंद्राच्या आवारात हाणामारीचे ही घटना घडली होती. त्यामुळे काही काळ मतदारात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा बलाच्या राखीव जवानांनी वेळीच हस्तक्षेप केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे पुढील अनर्थ टळला.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

नांदेडमध्ये दोन गावात हाणामारीची घटना

नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गावात तुफान हाणामारी झाली. बिलोली तालुक्यातील मुतन्याळ आणि लोहा तालुक्यातील जानापुरी गावात हाणामारी झाली. दोन्ही गावातील हाणामारीत जवळपास पन्नास जण जखमी झाले होते.

संबंधित बातमी : ‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें