‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटले आहे. 

'ग्रामपंचायती'च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान
फोटो प्रातनिधिक
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 6:42 PM

पुणे : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान झालं. उद्या (18 जानेवारी 2020) सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला अवघे काही तास उरले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.  (Gram Panchayat result Prohibition for Celebration after Win In Pune)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर ठिकठिकाणी जल्लोषात विजयी मिरवणुका काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी असेल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

तसेच सोमवारी रात्री 10 पासून ते मंगळवारी 6 पर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही यात म्हटले आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

(Gram Panchayat result Prohibition for Celebration after Win In Pune)

संबंधित बातम्या : 

पुणे ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल 80.54 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कोणत्या ग्रामपंचायतीत?

ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.