AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलीव्हरीनंतर घरी गेली, असह्य वेदनांनी गडाबडा लोळू लागली; डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर गर्भाशयात जे दिसलं ..

डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात. प्रयत्नांची पाराकाष्ठा करून आजारी, जखमी रुग्णाला वाचवणारे, जीवदान देणारे हे डॉक्टर प्रत्येक पेशंटसाठी देवासमानच असतात. पण कधी याच डॉक्टरमुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला तर ? त्याच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला यातना सहन कराव्या लागल्या तर ? असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे.

डिलीव्हरीनंतर घरी गेली, असह्य वेदनांनी गडाबडा लोळू लागली; डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर गर्भाशयात जे दिसलं ..
| Updated on: May 07, 2024 | 3:19 PM
Share

डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात. प्रयत्नांची पाराकाष्ठा करून आजारी, जखमी रुग्णाला वाचवणारे, जीवदान देणारे हे डॉक्टर प्रत्येक पेशंटसाठी देवासमानच असतात. पण कधी याच डॉक्टरमुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला तर ? त्याच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला यातना सहन कराव्या लागल्या तर ? असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत चक्क कापडच राहून गेलं. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. अखेर त्या महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करून, तिच्या गर्भपिशवीतून ते कापड बाहेर काढण्यात आले आणि तिला वेदनांपासून आराम मिळाला. या घटनेमुळे रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

काय घडलं नेमकं ?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथे राहणाऱ्या पांडे नावाच्या व्यक्तीची पत्नी ही पहिल्या प्रसूतीसाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात 24 एप्रिल रोजी दाखल झाली. 25 एप्रिल रोजी त्यांची ती नॉर्मल प्रसूती झाली. डिलीव्हरीदरम्यान रक्तस्राव होऊ नये म्हणून कापड लावण्यात येतं मात्र ते कापड 12 ते 24 तासांच्या आत काढावं लागतं. मात्र पांडे यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी लावण्यात आलेलं कापड काढण्यातच आलं नाही. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने ते कापड काढलं गेलं नाही आणि तसंच गर्भपिशवीत राहिलं.

असह्य वेदना आणि त्रास

संबंधित महिलेला 27 एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि ती घरी गेली. मात्र घरी गेल्यावर तीन-चार दिवसांनी तिला असह्य वेदना व्हायला लागल्या. तसेच घाण वास येऊ लागला. त्यामुळे पांडे यांची पत्नी घाबरली व तिने पटीला सगळा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ खासगी रुग्णालय गाठले. त्यावेळी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या गर्भाशयात कापड असल्याचे त्यांना आढळले. नंतर डॉक्टरांनी वेळीच उपचार करून ते कापड काढून टाकलं. आणि सुदैवाने तिचा जीव वाचला. मात्र तोपर्यंत तिला असह्य वेदना आइ मनस्ताप सहन करावा लागला.

पीडित महिलेच्या पतीने मागितली नुकसानभरपाई

इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरण्याआधी ते कापड आम्ही खाजगी रुग्णालयात डॉक्टरांमार्फत काढून टाकल्याने जीवाचा धोका टळला. मात्र तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अशा निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागला. याप्रमाणे आणखीही अनेक लोकांना कोणता ना कोणता त्रास सहन करावा लागला असेल, काहींना जीवही गमवावा लागतो. याप्रकरणी चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी व आम्हाला झालेला आर्थिक भुर्दंड द्यावा, अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात काय झालं याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. त्यानुसार चौकशी सुरू असून यामध्ये कोणी दोष आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, नितीन मिसूळकर यांनी सांगितलं.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....