AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : माझा मोठा भाऊ अन् मार्गदर्शक…; नाना पाटेकरांच्या चटका लावणाऱ्या एक्झिटनंतर CM फडणवीस काय म्हणाले?

नाना पाटेकरांच्या चटका लावणाऱ्या एक्झिटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक भाऊ, मार्गदर्शक भावना गेल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

Nana Patekar : माझा मोठा भाऊ अन् मार्गदर्शक...; नाना पाटेकरांच्या चटका लावणाऱ्या एक्झिटनंतर CM फडणवीस काय म्हणाले?
cm devendra fadnavis on nana patekar Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 11:23 AM
Share

नाना पाटेकर यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीसहित राजकीय वर्तुळालाही धक्का बसला आहे. पाटेकर यांच्या नाना पाटेकरांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शोककळा पसरली आहे. दुष्काळाच्या काळात नाना पाटेकर हे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायचे. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक वर्ष कार्य केलं. पाटेकरांची सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातील नेत्यांशी देखील चांगली मैत्री होती. आज भारतीय सिनेसृष्टीतील ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय नेतेही हळहळ व्यक्त करत आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनही भाऊ अन् मार्गदर्शक गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भारतीय सिनेमातील दिग्गज कलाकार आणि चांगले व्यक्ती…नाना पाटेकर यांचं अचानक निधन होणे ही दुर्दैवी घटना आहे. ‘क्रांतीवर’ ते ‘नटसम्राट’ अशा अनेक सिनेमातून त्यांनी फक्त मनोरंजन केलं नाही. तर लोकांचे प्रबोधन केलं. ते देशप्रेमी होते. सीमाभागातील लोक, सैन्य दलातील सैनिक आणि दुष्काळात नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणच्या माध्यमातून कार्य केलं. अनेकांना प्रेरित केलं. त्यामुळे ते जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी काम केलं. त्यांच्या निधनाने मोठा आघात झाला आहे. माझं व्यक्तिगत देखील नुकसान झालं आहे. माझ्या भाऊ, मार्गदर्शकासारखे होते.  देशभक्त, अभिनेते आपल्यातून निघून गेले. त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो’.

CM देवेंद्र फडणवीसांची पोस्ट जशीच्या तशी 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले’.

‘शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा