AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते नाराज नाहीत तर…; एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी, काय म्हणाले?

Devendra Fadnavis News: पुणे विधानपरिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडून आल्या आहेत. यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली.

ते नाराज नाहीत तर...; एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी, काय म्हणाले?
| Updated on: Oct 14, 2026 | 7:27 PM
Share

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्व पक्ष कामाला लागले आहेत. अशातच पुण्यातील दोन जागांसाठी भाजप आणि शिंदेसेनेमध्ये नाट्यमय संघर्ष दिसून आला होता. शिंदेसेनेकडून मंगेश चिवटेंनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर भाजपमधूनही अधिकृत उमेदवार उभा करण्यात आला होता. यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले होते. यानंतर मंगेश चिवटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे समोर आले. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. ते आता चर्चेत आले आहे.

निवडणुकीसंदर्भात आज एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिंदेसाहेब नाराज नाहीत. तुम्ही सगळे नाराज आहात. त्यामुळे त्यांच्याविषयी विनाकारण अफवा पसरवू नका, असं म्हणत त्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात नव्या मेडीकल कॉलेजच्या जागांना मंजुरी देण्यात आली आहे. आपल्या ईएसआयसी हॉस्पिटलला दर्जा देण्यासाठी पुण्यात केंद्रीय मंत्र्यांनी एमबीबीएसच्या 50 जागांसह हाँस्पिटलला मान्यता दिली आहे. माननीय नड्डा आणि मोदींजीचे मी आभार मानतो. यासाठी माधुरी ताई आणि मुरली अण्णा सात्यतानं प्रयत्न करत होते .

ते म्हणाले की, पुणे पदवीधर मतदार संघात भैय्या माने आणि शरद लाड यांनी स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभ्या राहण्याचं ठरवलेलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करतील. एकूणचं विधानपरिषदेच्या एकूण 5 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. पुणे शिक्षक मतदारसंघात लढत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात जागा आहे. पाचही जागा आमच्या निवडून येणार आहेत.

फडणवीस म्हणाले की, सचिन सानप अपक्ष म्हणून उभे राहिलेलं आहेत. माझं मतं कुणाची कुणाशी जवळीक असली तरी शिवसेना , भाजपा राष्ट्रवादीचे आमदार आणि नगरसेवक भाजपचा काम करतील. आज सगळे नगरसेवक आणि आमदार उपस्थिती होते. मी कामाची अपेक्षा काय हे सांगितलेलं आहे. आपण निवडणूक लढतो. आपल्याला पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवावी लागते.

Follow Us
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ