AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांची रॉयल एनफिल्डवरुन एंट्री, PUC नसल्याची वर्षा गायकवाड यांची टीका, भाजपाचे चोख उत्तर

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात रॉयल एनफिल्ड मोटारसायकलवरुन प्रवेश केला.त्यावर कॉग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी टीका केली. त्याला भाजपाने उत्तर दिले आहे.

फडणवीसांची रॉयल एनफिल्डवरुन एंट्री, PUC नसल्याची वर्षा गायकवाड यांची टीका, भाजपाचे चोख उत्तर
devendra fadnavis and varsha gaikwad
| Updated on: May 14, 2026 | 4:18 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी आपले परदेश प्रवास दौरे रद्द केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॉयल एनफिल्ड मोटरसायकलवरुन विधानभवनात एण्ट्री मारली. यावर काँग्रेसच्या खासदार यांनी टीका करीत या मोटरसायकलचे प्रमाणपत्र संपलेले असल्याची टीका समाजमाध्यमावर केली आहे.त्याला आता भाजपाने जोरदार उत्तर दिले आहे.

येथे पोस्ट वाचा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच देशातील जनतेला इंधनाच्या बचतीसह अनेक बाबतीत काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॉयल एनफिल्डवरुन गुरुवारी विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी टीका केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या मोटरसायकलची पीयूसी प्रमाणपत्र संपलेले असल्याची टीका केली आहे. त्याला आता भाजपाचे प्रवक्त नवनाथ बन यांनी जोरदार उत्तर दिलेले आहे.

येथे पोस्ट वाचा –

भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्या तक्रारीला उत्तर दिले आहे. ते या पोस्टमध्ये म्हणतात की “PUC वरून स्वस्त राजकारण करण्यापेक्षा आधी वर्षा गायकवाडांनी तथ्य तपासून पाहावे म्हणजे अशी फजिती झाली नसती, तुम्ही पंतप्रधानांचे आवाहन अमलात आणणार की नाही हे आधी सांगा असाही टोला बन यांनी लगावला आहे.

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी वर्षा गायकवाड यांना उत्तर देताना म्हटले आहे की वर्षाताई,हे र वाहन पोलिस विभागाचे आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्याने पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंग सुद्धा झाली. वाहन प्रणालीवर 9 ते 18 मे पर्यंत कामकाज बंद असल्याने त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या (PUC) सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आधीच घेतले होते असे म्हटले आहे.

..तर स्वतःचीच फजिती टळली

जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्तातील प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. असो, मूळ प्रश्न आपण मा. पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही, हा आहे. त्याचे उत्तर आधी द्या, ‘तोवर इधर-उधर की बात ना कर’! वर्षाताईंनी ट्वीट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिलं असतं, तर स्वतःचीच फजिती टळली असती असेही बन यांनी म्हटले आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...